सनी लिओनीला झालीय भारतात परतण्याची घाई, लॉकडाउनदरम्यान कुटुंबासोबत गेली होती अमेरिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 13:59 IST2020-06-04T13:58:47+5:302020-06-04T13:59:31+5:30
लॉकडाउनदरम्यान मुंबईतून अमेरिकेला गेलेल्या सनी लिओनीला आता पुन्हा लवकर मुंबईत यायचं आहे.

सनी लिओनीला झालीय भारतात परतण्याची घाई, लॉकडाउनदरम्यान कुटुंबासोबत गेली होती अमेरिकेत
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनी लॉकडाउनदरम्यान अचानक मुंबईतून अमेरिकेत गेली होती. आता नुकतेच तिने एका मुलाखतीत अमेरिकेत गेल्याच्या निर्णयाबद्दल आणि इतर गोष्टींचा खुलासा केला. आता तिला भारतात परतायचे असल्याचंही तिने सांगितले.
सनी लिओनीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती आमची 39 तासांची खूप मोठी जर्नी होती. आम्ही खूप थकलो होतो, मात्र आम्ही कसंबसं एडजस्ट केले. पर्सनली मुंबई सोडण्याच्या कारणामुळे मी खूप दुःखी होते आणि माझ्यावर विश्वास ठेवा की मला अजिबात मुंबई सोडून अमेरिकेला जायचे नव्हते. त्यामुळेच आम्हाला अमेरिकेला जायचा निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ लागला.
सनी पुढे म्हणाली की, सध्याच्या घडीला आम्हाला डेनियलची आई व कुटुंबासोबत राहणं गरजेचे होते. तसे तर हैराण करणारी गोष्ट ही माझी मुलं इथे खूप एन्जॉय करत आहेत. खरेतर त्यांना एडजस्ट करायला थोडा वेळ लागला होता.
मुंबईत परतण्याबद्दल सनीने सांगितले की, भारतात आम्ही तेव्हा परत येऊ जेव्हा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होईल. आम्हालादेखील लवकरात लवकर मुंबईत यायचे आहे.
मुंबईतून अमेरिकेत गेली होती याची माहिती सनीने सोशल मीडियावर दिली होती. तिने मुलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले होते की, जेव्हा तुमच्या जीवनात मुलं असतात तेव्हा तुमचे प्राधान्य बदलून जाते.
ती पुढे म्हणाली की, मी व डॅनिएल मुलांना इथे घेऊन आलो आहोत जिथे आमची मुलं कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहतील. ते म्हणजे आमचे घर लॉस अँजेलिस.मला माहित आहे की माझ्या आईनेदेखील हेच केले असते.