सनी लिओनीने का घेतला निशाला दत्तक घेण्याचा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 14:26 IST2017-07-21T08:56:34+5:302017-07-21T14:26:34+5:30

 पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी अखेर आई झाली. होय, सनी आणि तिचा ...

Sunny Leone decided to adopt Nithala? | सनी लिओनीने का घेतला निशाला दत्तक घेण्याचा निर्णय?

सनी लिओनीने का घेतला निशाला दत्तक घेण्याचा निर्णय?

 
ॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी अखेर आई झाली. होय, सनी आणि तिचा पती डेनिअल वेबर या दोघांनी महाराष्ट्राच्या लातूरच्या मुलीला दत्तक घेत, तिचे पालकत्व स्विकारले. निशा कौर वेबर असे तिचे नामकरण करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये एकीकडे टेस्टट्यूब बेबी आणि सरोगसीचे प्रस्थ वाढत असताना सनी व डेनिअलचा मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय नक्कीच कौतुकास्पद मानायला हवा.



स्वत:चे बाळ होऊ देण्यापेक्षा सनी व डेनिअल या दोघांनी निशाला दत्तक घ्यायचा निर्णय का घेतला, यामागे त्यांच्या काय भावना आहेत, निशाचा फोटो पाहिल्यांनतर सनीच्या मनात कुठल्या भावना उठल्या, हे सगळे सनीने सांगितले आहे. तूर्तास निशाच्या घरी येण्याने सनी व डेनिअल दोघेही प्रचंड आनंदात आहे. हा आनंद कुठे ठेवू अन् कुठे नको, असे त्यांना झाले आहे. एका मुलाखतीत दोघांनीही आपल्या या भावना शेअर केल्यात. निशा ही आम्हाला मिळालेली ईश्वरी भेट आहे. आम्ही नाही तर निशाने आई-बाबा म्हणून आमची निवड केली. मी निशाचा फोटो पाहिला त्याक्षणीच्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आनंद,उत्साह आणि डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा अशी काही माझी अवस्था होती. खरे तर इतरांना बाळासाठी नऊ महिने प्रतीक्षा करावी लागते. पण आमच्याबाबतीत तीन आठवड्यांमध्येच सर्व काही निश्चित करण्यात आलं, असे सनी म्हणाली.

डेनिअलनेही निशाच्या आगमनाबद्दल भावविभोर प्रतिक्रिया दिली. आमचे आयुष्य फार वेगळे आहे. इथे नऊ महिन्यांचा फार संबंध नव्हताच. माझ्यासाठी निशा घरात येण्याची प्रक्रिया म्हणजे, दोन वर्षांची प्रक्रिया होती. भरपूर पेपर वर्क आणि अनेक कायदेशीर सोपस्कार अशा दोन वर्षांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकेदिवशी मला मेल आला, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. त्या मेलनंतर आम्ही निशाच्या आगमनाच्या तयारीत लागतो आणि अखेर तो क्षण आला. दोन वर्षांपूर्वी मी व सनीने एका अनाथआश्रमाला भेट दिली होती. त्याचवेळी आम्ही हा निर्णय घेतला होता, असे डेनिअलने सांगितले.

Web Title: Sunny Leone decided to adopt Nithala?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.