सनी लिओनीने खास पद्धतीने साजरा केला ख्रिसमस, गरजू मुलांसाठी बनली सांताक्लॉज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 19:56 IST2023-12-25T19:53:21+5:302023-12-25T19:56:20+5:30

बॉलिवूडमध्ये ख्रिसमसचा जल्लोष पाहायला मिळाला.

Sunny Leone celebrated Christmas with children | सनी लिओनीने खास पद्धतीने साजरा केला ख्रिसमस, गरजू मुलांसाठी बनली सांताक्लॉज

सनी लिओनीने खास पद्धतीने साजरा केला ख्रिसमस, गरजू मुलांसाठी बनली सांताक्लॉज

देशभरात ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम आहे. वर्षभर शेवटच्या सणाची म्हणजे ख्रिसमसची लोक वाट पाहत असतात. ख्रिसमस हा सण आनंद घेऊन येतो.  विशेषतः लहान मुलांमध्ये सांताक्लॉजबद्दल खूप उत्साह दिसून येतो. त्यांना भेटवस्तू देण्यासाठी सांता येणार, याची ते वर्षभर वाट पाहतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडमध्ये ख्रिसमसचा जल्लोष पाहायला मिळाला. अभिनेत्री आणि उद्योजिका सनी लिओनीने यंदाचा ख्रिसमस खास पद्धतीने साजरा केला.

सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल यांनी गरजू लोकांसोबत ख्रिसमस साजरा केला. या जोडप्याने गरजू मुलांना ख्रिसमस भेटवस्तू दिल्या. यामुळे सनी लिओनीचे चाहते तिचं कौतुक करत आहेत. सनी लिओनी माणूस म्हणून किती चांगली आहे याचं उत्तम उदाहरण, असे चाहते म्हणत आहेत.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सनी लवकरच 'ग्लॅम फेम'मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती अनुराग कश्यपच्या 'केनेडी'मध्ये राहुल भट्टसोबत अभिनय करताना दिसणार आहे. याशिवाय सनी ही जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारासोबतच  'कोटेशन गँग' मध्ये झळकणार आहे. 

सनी लिओनीचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. सनीने 'जिस्म २’ चित्रपटातून' बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती.
 

Web Title: Sunny Leone celebrated Christmas with children