एकीकडे मोडतोय सावत्र बहिणीचा संसार, अन् सनी साजरा करतोय आनंदोत्सव? 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:04 PM2024-01-19T12:04:37+5:302024-01-19T12:05:03+5:30

Sunny deol: सनी देओलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

sunny-deols-sister-daughter-to-be-married-actor-reached-udaipur-to-see-the-venue | एकीकडे मोडतोय सावत्र बहिणीचा संसार, अन् सनी साजरा करतोय आनंदोत्सव? 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

एकीकडे मोडतोय सावत्र बहिणीचा संसार, अन् सनी साजरा करतोय आनंदोत्सव? 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

सध्या कलाविश्वामध्ये बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) आणि हेमा मालिनी (hema malini) यांची लेक ईशा देओल (isha deol) हिच्या वैवाहिक जीवनाची चर्चा रंगली आहे. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांच्या संसारात वादाची ठिणगी पडली असून ही जोडी त्यांचा १२ वर्षांचा संसार मोडणार असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. यामध्येच ईशाचा सावत्र भाऊ, अभिनेता सनी देओल (sunny deol) याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा करत असल्याचं दिसून येत आहे.

एकीकडे ईशाचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. तर, दुसरीकडे सनीच्या घरात सनईचौघडे वाजणार आहेत. सनीच्या भाचीचं लवकरच लग्न होणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरात लग्नाच्या धावपळीला सुरुवात झाली आहे.  यामध्येच सनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो उदयपूरला वेडिंग डेस्टिनेशन पाहायला गेल्याचं दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, सनी देओल कडेकोट बंदोबस्तामध्ये उदयपूरच्या महाराणा प्रताप डबोक विमानतळावर पोहोचला. येथे त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर तो थेट विवाहस्थळाच्या दिशेने रवाना झाला. यावेळी त्याने एका इव्हेंट कंपनीसोबत लग्नविधी आणि अन्य कार्यक्रमांविषयी चर्चा केली.

दरम्यान, सनी देओलच्या भाचीचं २९ ते ३१ जानेवारी दरम्यान लग्न होणार आहे. हा लग्नसोहळा उदयपूरमध्ये रंगणार आहे. त्यामुळे या लग्नात धर्मेंद्र, हेमा मालिनी, बॉबी देओल, ईशा देओल यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यही सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: sunny-deols-sister-daughter-to-be-married-actor-reached-udaipur-to-see-the-venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.