सनी देओलच्या सिनेमातून डेब्यू करणार होती ऐश्वर्या राय, सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते, मग कुठे बिनसलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:00 IST2023-09-11T15:48:04+5:302023-09-11T16:00:35+5:30

अलिकडेच एका मुलाखतीत सनी देओल खुलासा केला की ऐश्वर्या राय त्याच्या सिनेमातून डेब्यू करणार होती.

Sunny deol reveals aishwarya rai was going to debut with film india but film shelved due to budget | सनी देओलच्या सिनेमातून डेब्यू करणार होती ऐश्वर्या राय, सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते, मग कुठे बिनसलं?

सनी देओलच्या सिनेमातून डेब्यू करणार होती ऐश्वर्या राय, सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते, मग कुठे बिनसलं?

सनी देओल सध्या 'गदर २' सक्सेस एन्जॉय करतोय.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. अमिषासोबतची सनीची केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडली आहे. अभिनेत्याच्या करिअरमधला सर्वात सुपरहिट सिनेमा म्हणून नोंद करण्यात आली आहे. या चित्रपटात सनी देओल (Sunny Deol)सोबत आमिषा पटेल (Amisha Patel) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. अलिकडेच एका मुलाखतीत सनीने तिच्यासोबत डेब्यू करणार असलेल्या आणखी एका अभिनेत्रीबद्दल सांगितलं.  

सनीने सांगितले की तो 'इंडियन' नावाचा चित्रपट बनवत होता आणि ऐश्वर्याला त्याच्या या सिनेमातून डेब्यू करणार होती. यातील काही गाणी शूटदेखील झालं होतं. पण बजेटच्या इश्शुमुळे हा सिनेमा होऊ शकला नाही. त्यावेळी चित्रपटातील काही फोटोदेखील लीक झाले होते आणि यात सनीचा एक लूक 'गदर 2' मधील लूकसारखा होता. 

फिल्मीबीटच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटातील सनी देओल आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावर चित्रित केलेल्या ग्लॅमरस आणि बोल्ड गाण्यांवर निर्मात्यांनी 1.75 कोटी रुपये खर्च केले होते. ९० च्या दशकात फक्त गाण्यांवर एवढा मोठा खर्च करणे ही मोठी गोष्ट होती. या चित्रपटात सनीने दुहेरी भूमिका साकारली होती.

 

Web Title: Sunny deol reveals aishwarya rai was going to debut with film india but film shelved due to budget