सनी देओलला लागली लॉटरी; 'या' खास भूमिकेसाठी मिळाली 45 कोटींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 09:58 PM2023-10-26T21:58:41+5:302023-10-26T21:59:15+5:30

Sunny Deol Fees: 'गदर 2' च्या यशानंतर सनी देओलला एकामागून एक चित्रपटांची ऑफर मिळत आहे.

sunny-deol-got-offer-of-45cr-for-ramayana-hanuman-role | सनी देओलला लागली लॉटरी; 'या' खास भूमिकेसाठी मिळाली 45 कोटींची ऑफर

सनी देओलला लागली लॉटरी; 'या' खास भूमिकेसाठी मिळाली 45 कोटींची ऑफर


Sunny Deol Film: एक काळ होता, जेव्हा अभिनेता सनी देओलला चित्रपट मिळणे कठीण झाले होते. फ्लॉप चित्रपटामुळे सनी बॉलिवूडमधून बाहेर फेकला गेला होता. पण, हे वर्ष सनीसाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. 11 ऑगस्ट रोजी सनीचा 'गदर 2' प्रदर्शित झाला आणि यातून सनीने जबरदस्त पुनरागमन केले. आता त्याला एकामागून एक चित्रपटांची ऑफरच येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. आता अशीही चर्चा सुरू झाली आहे की, या भूमिकेसाठी सनीला 45 कोटी रुपयांची फी मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओलची नितेश तिवारी आणि निर्माते मधु मंटेना यांच्याशी चर्चाही झाली आहे.

या भूमिकेसाठी सनी खूप उत्सुक आहे. रामायणाच्या शूटिंगदरम्यान सनीने दुसरा कोणताही प्रोजेक्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला त्याच्या पात्राकडे पूर्ण लक्ष द्यायचे आहे आणि भगवान हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी तो त्याच्या फिटनेसवरही काम करेल. रामायणसाठी दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते मधु मंटेना यांच्यासोबत त्याची 45 कोटी रुपयांची डील जवळपास फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे, सनीला साऊथच्या एका चित्रपटासाठी 75 कोटींची ऑफर मिळाल्याचीही चर्चा आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असेल. याबाबत सध्या फक्त चर्चाच सुरू आहे. यापूर्वी सनीने 'बॉर्डर 2' साठी भूषण कुमार आणि निधी दत्ता, यांच्यासोबत 50 कोटी रुपयांचा करार केल्याची बातमी आली होती. 'रामायण' नितेश तिवारींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाची भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. स्क्रिप्टवर काम सुरू आहे.

Web Title: sunny-deol-got-offer-of-45cr-for-ramayana-hanuman-role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.