Video: "किती पैसे हवेत?" धर्मेंद्र यांचे अस्थी विसर्जन करायला गेलेला सनी देओल भडकला, पापाराझींचा कॅमेरा खेचला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:36 IST2025-12-03T15:31:53+5:302025-12-03T15:36:59+5:30
आज सनी देओल त्याच्या कुटुंबासोबत हरीद्वारमध्ये धर्मेंद्र यांचं अस्थी विसर्जन करायला गेला होता. त्यावेळी समोर फोटोग्राफरला पाहताच सनीचा राग चांगलाच अनावर झाला

Video: "किती पैसे हवेत?" धर्मेंद्र यांचे अस्थी विसर्जन करायला गेलेला सनी देओल भडकला, पापाराझींचा कॅमेरा खेचला अन्...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या अस्थींचे विसर्जन हरिद्वार येथील हर की पौडी घाटावर करण्यात आले. कुटुंबाच्या उपस्थितीत आज धर्मेंद्र यांच्या अस्थींचं विसर्जन पार पडले. यावेळी गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु त्यावेळी समोर असलेल्या पापाराझींना पाहताच सनी देओल चांगलाच भडकलेला दिसला. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.
'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास धर्मेंद्र यांचा नातू करण देओल यांनी आजोबांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या. अस्थी विसर्जनादरम्यान करण देओल अत्यंत भावूक झाला असून त्याला अश्रू अनावर झाले.
पापाराझीवर भडकला सनी देओल
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाच्या वेळी काही पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. यामुळे अभिनेता सनी देओल अत्यंत संतापला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सनी देओल एका फोटोग्राफरकडे जाताना दिसतो.
"पैसे चाहिए तेरे को कितने पैसे चाहिए"
— Abhishek (@vicharabhio) December 3, 2025
This happened when Dharam Ji's asthi visarjan was going on at Haridwar and someone started recording them secretly.
Sunny Deol's anger is totally justified,
Respect the family in tough situations or face the heat.
pic.twitter.com/VFw1jCNByx
राग अनावर झालेल्या सनीने पापाराझीचा कॅमेरा हिसकावून घेतला आणि त्याला रागात विचारलं, "तुम्ही लोकांनी लाज विकली आहे का? तुम्हाला पैसे पाहिजेत? किती पैसे पाहिजेत?" अशा प्रकारे खासगी क्षणांमध्ये फोटो काढल्याबद्दल सनीने तीव्र नाराजी व्यक्त केली. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.