अपघात झाला तेव्हा सनी देओल सर्वात पहिला भेटायला आला.. मुलगा सनी देओल सोबतच्या नात्याबाबत बोलल्या हेमा मालिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 11:09 IST2017-10-17T05:39:45+5:302017-10-17T11:09:45+5:30

हेमा मालिनी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ‘बियाँड द ड्रिम गर्ल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. बॉलिवूड अभिनेत्री  दीपिका पदुकोणच्या हस्ते पुस्तकाचे ...

Sunny Deol first appeared for the accident when the accident happened. Hema Malini talked about her son's relationship with Sunny Deol | अपघात झाला तेव्हा सनी देओल सर्वात पहिला भेटायला आला.. मुलगा सनी देओल सोबतच्या नात्याबाबत बोलल्या हेमा मालिनी

अपघात झाला तेव्हा सनी देओल सर्वात पहिला भेटायला आला.. मुलगा सनी देओल सोबतच्या नात्याबाबत बोलल्या हेमा मालिनी

मा मालिनी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ‘बियाँड द ड्रिम गर्ल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. बॉलिवूड अभिनेत्री  दीपिका पदुकोणच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण केले. या पुस्तकात हेमा मालिनी यांच्या आयुष्यातले वेगवेगळ्या पैलू उलगडण्यात येणार आहेत. हे पुस्तक ‘स्टारडस्ट’चे माजी संपादक आणि निर्माता राम कमल मुखर्जी यांनी लिहिले आहे. यात हेमांचा अभिनय प्रवास सविस्तर वाचायला मिळणार आहे. त्या अभिनयात कशा आल्यात, राजकारणात कशा आल्यात, हे यात वाचायला मिळणार आहे. या पुस्तक अनावरण्याच्या वेळी हेमा मालिनी यांनी आपली सावत्र मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. 

त्या म्हणाल्या की, जेव्हा पुस्तकाचे नाव ‘बियाँड द ड्रिम गर्ल’ आहे तर त्या काळातील गोष्टींची चर्चा तर होणारच. लोक नेहमीच सनी आणि बॉबीसोबत माझे नातेसंबंध कशा प्रकारचे आहेत. यावर नेहमीच चर्चा करताना दिसतात. हेमा मालिनी म्हणाल्या की, जेव्हाही मला मदतीची गरज लागते तेव्हा मदतीसाठी सर्वात आधी धावून येणारा दुसरा तिसरा कोणी नसून सनी असतो. पुढे त्या म्हणाल्या  २०१५ मध्ये जेव्हा माझ्या गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी मला पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या यादीत पहिले नाव सनीच होते.  गोष्टी आमच्यातील नात्याबद्दल खूप काही स्पष्ट करणाऱ्या असल्याचे हेमा मालिनी यांनी सांगितले.

ALSO RAED :   Birth Day Special : ​ हेमा मालिनी व जितेन्द्र यांच्या ‘न झालेल्या’ लग्नाची गोष्ट...खास आपल्यासाठी!

हेमा यांनी ज्यावेळी धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला त्यावेळी धर्मेंद्र चार मुलांचे पिता होते. त्यांचा विवाह प्रकाश कौर यांच्याशी झालेला होता. धर्मेंद्र यांचा हा दुसरा विवाह होता. हेमा यांच्या कुटुंबीयांचा देखील या लग्नाला विरोध होता. पंजाबी कुटुंबातील विवाहित धर्मेंद्र त्यांना जावई म्हणून नको होते. धर्मेंद्र व हेमा यांच्या अफेअरची चर्चा रंगू लागल्यावर कुटुंबीयांनी हेमा यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. त्यामुळे हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील असे किस्से जे आजपर्यंत कोणालाच माहिती नाहित ते या पुस्तकामुळे जगाच्या समोर येणार आहेत.  

Web Title: Sunny Deol first appeared for the accident when the accident happened. Hema Malini talked about her son's relationship with Sunny Deol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.