​अखेर सनी देओलला लेकासाठी मिळाली हिरोईन! पलक तिवारी ठरली पहिली पसंत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 15:52 IST2017-06-23T04:56:29+5:302017-06-23T15:52:39+5:30

बॉलिवूडचा ‘अ‍ॅक्शन किंग’ सनी देओल सध्या मुलगा करण देओल याच्या ‘पल पल दिल के पास’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त ...

Sunny Deol finally got a heroine! Palak Tiwari is the first choice !! | ​अखेर सनी देओलला लेकासाठी मिळाली हिरोईन! पलक तिवारी ठरली पहिली पसंत!!

​अखेर सनी देओलला लेकासाठी मिळाली हिरोईन! पलक तिवारी ठरली पहिली पसंत!!

लिवूडचा ‘अ‍ॅक्शन किंग’ सनी देओल सध्या मुलगा करण देओल याच्या ‘पल पल दिल के पास’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. लेकाच्या चित्रपटासाठी सनी देओल प्रचंड मेहनत घेतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सनीला करणच्या हिरोईनचा शोध होता. करणच्या अपोझिट सनीला एका सुंदर अभिनेत्री हवी आहे. कदाचित आताश: सनीचा हा शोध संपलाय.होय, चर्चा खरी मानाल तर, टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हीच्या जवळ हा शोध येऊन थांबलाय. करणच्या ‘पल पल दिल के पास’साठी पलक तिवारी ही मेकर्सची पहिली पसंत ठरली आहे. फिल्ममेकर्सनी पलकला आॅडिशन्ससाठीही बोलवल्याचे कळतेय.  त्यामुळे पलक या चित्रपटात लीड हिरोईन म्हणून दिसलीच तर  नवल वाटायला नको. फिल्ममेकर्सनी करणच्या या चित्रपटासाठी आत्तापर्यंत २०० मुलींचे आॅडिशन्स घेतले आहे. पण यापैकीही एकही मुलगी फायनल झाली नाही.पण पलकचे नुसते फोटो बघून मेकर्सनी तिला आॅडिशन्ससाठी बोलवल्याचे कळते. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. विजेता फिल्म्सच्या बॅनरखाली बनणारा करणचा हा चित्रपट एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. खुद्द सनी देओल याचा डायरेक्टर आहे.





ALSO READ : श्वेता तिवारी सुंदर मुलगी बनणार दर्शील सफारीची हिरोईन!

मध्यंतरी . पलक  ‘वन फिल्म, वन वंडर किड’ दर्शील सफारीसोबत बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची बातमी आली होती. Quickie  हा चित्रपट दर्शीलने साईन केलाय आणि या चित्रपटासाठी फिमेल लीड म्हणून पलक तिवारीचे नाव निश्चित झाले असल्याचे समजले होते. पलक ही श्वेता तिवारी आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. २००७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. या दोघांचा एक मुलगा आहे.  

Web Title: Sunny Deol finally got a heroine! Palak Tiwari is the first choice !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.