सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्रीच्या किसिंग सीनमुळे झाला होता गदारोळ, मग असं पूर्ण केलं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 15:40 IST2023-05-06T15:37:45+5:302023-05-06T15:40:37+5:30

अभिनेत्रीने स्वत: सांगितलं कसा शूट झाला तो सीन.

Sunny deol and meenakshi sheshadri kissing scene in dacait | सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्रीच्या किसिंग सीनमुळे झाला होता गदारोळ, मग असं पूर्ण केलं शूटिंग

सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्रीच्या किसिंग सीनमुळे झाला होता गदारोळ, मग असं पूर्ण केलं शूटिंग

दामिनी, शहेनशाह आणि घायाळ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्य आणि अभिनयाची जादू पसरवणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री(Meenakshi Sheshadri)चे आजही करोडो चाहते आहेत. मीनाक्षी शेषाद्री आज जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी एक काळ असा होता जेव्हा चाहत्यांना तिची अदा आवडायची. मीनाक्षी शेषाद्री हिचे नाव अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये गणले जाते ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अगणित सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

मीनाक्षीचे नाव सनी देओलसोबत जोडले गेले होते. सनी देओल त्यावेळी विवाहित होता आणि तो डिंपल कपाडियाच्या जवळचा असल्याचे बोलले जात होते. मात्र असे असूनही दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. पण दोघांचा हा रोमान्स फार काळ टिकू शकला नाही आणि दोघेही वेगळं झाल्याचं बोललं जातंय.

सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. यामध्ये सुपरहिट चित्रपट दामिनीचा देखील समावेश आहे. दोघे डकैत चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात सनी देओल आणि मीनाक्षीचा किसिंग सीनही शूट करण्यात आला होता. जरी हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. मात्र सीनवरुन बराच गदारोळ झाला होता आणि सेन्सॉर बोर्डाने तो चित्रपटातून काढून टाकला होता.

मीनाक्षी शेषाद्रीने स्वतः या किसिंग सीनबद्दल खुलासा केला होता. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, या सीनच्या शूटिंगदरम्यान ती खूप अस्वस्थ झाली होती. पण सनी देओलने तिच्यासाठी हा सीन सोपे केला होता.

तिने सांगितले की, "मी 'डकैत'मध्ये एक किस घेतले होते, जे गाण्याच्या आधी असते. सनीने मला आधी या सीन करता कम्फर्टेबल केलं. पण सेन्सॉरने तो काढून टाकला. " 

मीनाक्षीने बँकर हरीश म्हैसूर यांच्याशी लग्न केले आणि स्वत:ला बॉलिवूडपासून दूर केले. लग्नानंतर मीनाक्षी भारत सोडून अमेरिकेत शिफ्ट झाली. शेषाद्री आणि हरीश यांना दोन मुले आहेत. मीनाक्षी आता नृत्य अकादमी चालवते आणि मुलांना ही कला शिकवते.

Web Title: Sunny deol and meenakshi sheshadri kissing scene in dacait