सनी देओल अन् डिम्पल कपाडियाच्या ‘त्या’ व्हिडीओ धर्मेंद्रनी केले लाइक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 20:14 IST2017-09-29T14:44:44+5:302017-09-29T20:14:44+5:30

सध्या सनी देओल आणि डिम्पल कपाडिया सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याने दोघांच्या ...

Sunny Deol and Dimple Kapadia's 'those' videos made Dharmandini like! | सनी देओल अन् डिम्पल कपाडियाच्या ‘त्या’ व्हिडीओ धर्मेंद्रनी केले लाइक!

सनी देओल अन् डिम्पल कपाडियाच्या ‘त्या’ व्हिडीओ धर्मेंद्रनी केले लाइक!

्या सनी देओल आणि डिम्पल कपाडिया सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याने दोघांच्या नात्याविषयी नव्याने चर्चा रंगू लागली आहे. व्हिडीओमध्ये दोघेही लंडन येथे हातात हात घालून एक स्टॉपवर बसलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ जेव्हा समोर आला तेव्हा त्यांच्या जुन्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा नव्याने सुरू झाल्या. काहींनी या दोघांवर टीकाही केली. परंतु सनीपाजीचे वडील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मात्र या आपल्या लेकाच्या व्हिडीओबद्दल वेगळीच प्रतिक्रिया दिली. त्यांनी चक्क हा व्हिडीओ लाइक केला. 

होय, पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार धर्मेंद्र यांनी सनी आणि डिम्पलचा व्हिडीओ लाइक केला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर डेब्यू केलेल्या धर्मेंद्र यांच्या या लाइकमुळे आता या व्हिडीओवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. कमाल आर. खान ऊर्फ केआरके याने दोघांचा व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते की, सनी देओल आणि डिम्पल कपाडिया एकत्र हॉलीडे एन्जॉय करीत आहेत. दोघेही एकत्र एक चांगले कपल वाटत आहेत.’ केआरकेचे हे ट्विट म्हणजे सनी देओलला डिवचणारे होते. अशात धर्मेंद्रपाजी यांनी व्हिडीओ लाइक केल्याने, आता याचा अर्थ काय काढावा, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. 



वास्तविक बºयाच दिवसांपासून सनी आणि डिम्पल एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा हे दोघे एकत्र येतात. यावरून त्यांच्यातील संबंध अजूनही कायम आहेत, असेच म्हणावे लागले. दोघांच्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी ‘मंजिल मंजिल, गुनाह, आग का गोला, अर्जुन आणि नरसिम्हा’ या चित्रपटांमध्ये काम केले. यादरम्यान त्यांच्यात प्रेमप्रकरणही चांगलेच चर्चिले गेले. अनेकांनी केलेल्या दाव्यानुसार हे दोघे लग्न करू इच्छित होते. त्यावेळी अशाही बातम्या समोर आल्या होत्या की, सनीमुळे डिम्पल राजेश खन्नापासून विभक्त जाली होती. 

दरम्यान, केआरकेने जेव्हा सनी आणि डिम्पलचा व्हिडीओ शेअर केला होता, तेव्हा लोकांनी यावर त्यांचे मत व्यक्त केले. काहींनी सनीपाजीची फिरकी घेणारे मॅसेजही शेअर केले. मात्र अशातही बरेचसे असे लोक आहेत, जे या व्हिडीओविषयी पॉझिटीव्ह बोलत आहेत. 

Web Title: Sunny Deol and Dimple Kapadia's 'those' videos made Dharmandini like!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.