सप्टेंबरमध्ये रंगणार सोना विरूद्ध सनी मुकाबला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 16:35 IST2016-07-15T10:55:41+5:302016-07-15T16:35:57+5:30
सोनाक्षी सिन्हा आणि सनी लियोनी या दोघींपैकी बॉक्स आॅफिस स्टार कोण? असा प्रश्न केल्यास निश्चितपणे सोनाक्षीचे पारडे जड आहे. ...
.jpg)
सप्टेंबरमध्ये रंगणार सोना विरूद्ध सनी मुकाबला !
स नाक्षी सिन्हा आणि सनी लियोनी या दोघींपैकी बॉक्स आॅफिस स्टार कोण? असा प्रश्न केल्यास निश्चितपणे सोनाक्षीचे पारडे जड आहे. मात्र इंटरनेटील लोकप्रीयतेच्या बाबतीत विचाराल तर सनी सोनावर हावी झालेली दिसेल. आता येत्या सप्टेंबरमध्ये या दोघी बॉक्सआॅफिसवर एकमेकींच्या आमोरा-समोर येताना दिसणार आहे. होय, २ सप्टेंबर सोनाक्षीचा ‘अकिरा’ रिलीज होतोय. नेमक्या याच तारखेला सनीचा ‘बेईमान लव्ह’ही रिलीज होणार आहे. ‘अकिरा’चे दिग्दर्शक आर. मुरूगदास यांनी अलीकडे रिलीज डेट जाहिर केली. याऊलट ‘बेईमान लव्ह’ची रिलीज डेट आधीच ठरलेली होती.‘बेईमान लव्ह’चे निर्मार्ते व दिग्दर्शक राजीव चौधरी यांना विचाराल तर त्यांना ‘अकिरा’पासून काहीही भीती वाटत नाहीय. कारण त्यांच्यामते, सनीचा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. सनीचा ट्रॅक रेकॉर्ड बघाल तर, रिलीजच्या सुरुवातीच्या दिवसांत सनीला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. तसेही ‘बेईमान लव्ह’मध्ये सनी वेगळ्या अवतारात दिसणार आहे. महिलांच्या भल्यासाठी लढताना ती दिसणार आहे. तेव्हा सोना विरूद्ध सनी हा मुकाबला कसा रंगतो, ते बघूयात!
![]()