Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:48 IST2025-06-13T11:47:54+5:302025-06-13T11:48:26+5:30

Sunjay Kapur Death : संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. मृत्यूच्या तीन दिवस आधीच संजय कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर आयुष्याबाबत ही पोस्ट केली होती.

sunjay kapur death karisma kapoor ex husband post on life goes viral after died due to heart attack | Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल

Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती आणि बिझनेसमन संजय कपूर यांचं गुरुवारी(१२ जून) लंडनमध्ये निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. पोलो गेम खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. 

संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. मृत्यूच्या तीन दिवस आधीच संजय कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर आयुष्याबाबत ही पोस्ट केली होती. "पृथ्वीवरची तुमची वेळ ही निश्चित आहे. त्यामुळे काय होऊ शकतं ते तत्वज्ञानावर सोडा आणि का नाही वर लक्ष केंद्रित करा", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या निधनानंतर आता ही पोस्ट व्हायरल होत आहे. मंडे मोटिव्हेशन असं हॅशटॅग देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती.

 संजय कपूर यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि ती त्यांना चावली. आणि त्यामुळे संजय कपूर यांना श्वास घेण्यास अडचण झाली. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली, असंही कारण समोर आलेलं आहे.

संजय कपूर यांनी २००३ साली अभिनेत्री करिष्मा कपूरशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगाही झाला. मात्र लग्नानंतर १३ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. करिष्माने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. करिष्माशी घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी दुसरं लग्न केलं. 

Web Title: sunjay kapur death karisma kapoor ex husband post on life goes viral after died due to heart attack