गोविंदाला माफ करणार का? सुनिता आहुजाने ठेवली अट; म्हणाल्या, "आम्हाला हवं तसं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:55 IST2026-02-18T10:54:15+5:302026-02-18T10:55:52+5:30

गोविंदा माझं बालपणीचं प्रेम..., सुनिता आहुजाने ठेवली अट

sunita ahuja talks about forgiving govinda on some conditions know more | गोविंदाला माफ करणार का? सुनिता आहुजाने ठेवली अट; म्हणाल्या, "आम्हाला हवं तसं..."

गोविंदाला माफ करणार का? सुनिता आहुजाने ठेवली अट; म्हणाल्या, "आम्हाला हवं तसं..."

अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला होता. सुनिताने तर गोविंदावर अनेक आरोप लावले. त्याचं एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याचाही आरोप केला. तसंच लेकाच्या करिअरसाठी गोविंदाने काहीच योगदान दिलं नाही असं ती काही दिवसांपूर्वी म्हणाली. दरम्यान आता सुनिताने पुन्हा एक वक्तव्य केलं आहे. एका अटीवर गोविंदाला माफ करेन असं ती म्हणाली. काय आहे ती अट?

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सुनिता आहुजाने नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये गोविंदासोबतच्या नात्यावर भाष्य केलं. बालपणीचं प्रेम गोविंदाला काही अटींवर माफ करेन असं ती म्हणाली. व्लॉगमध्ये सुनिताने काही पत्रकारांना घरी बोलावून प्रश्नोत्तरांचं सेशन केलं. गोविंदाला कधी माफ करणार का? असं तिला विचारलं गेलं. त्यावर ती म्हणाली, "तुम्हाला माहित नसेल पण तो माझं बालपणीचं प्रेम आहे. जर त्याच्यात सुधारणा झाली आणि आम्हाला हवं तसं तो राहिला तर मी त्याला नक्कीच माफ करेन. हे बातम्यांमध्ये जे काही येत आहे ते ऐकायचं नाही. या वयात आता इतकं सगळं सहन करणं कठीण आहे. मी मेनोपॉजमधून जात आहे. अशा वेळी प्रत्येक महिलेला पती आणि मुलांच्या पाठिंब्याची गरज असते. कारण सतत मूड स्विंग्स होत असतात. अशा वेळी प्रेम हवं असतं स्ट्रेस नाही."

गोविंदाच्या करिअरमध्ये त्याला इतका पाठिंबा दिल्यानंतर त्या मोबदल्यात काय मिळालं यावर बोलताना सुनिता म्हणाली की त्याच्याजवळ त्याची काही कारण असतील. पण एका विशिष्ट वयानंतर पती आणि मुलंच महत्वाची असतात. गोविंदाशी कधी सरळ बोलणं झालं का? यावर ती म्हणाली, 'तो हसून सगळं टाळतो ना...त्याचं उतत्र समजतच नाही. आधी गोविंदा त्याच्या आईला घाबरायचा. पण आई गेल्यानंतर तो केअरफ्री झाला. आता तो कोणाला घाबरत नाही. त्यात त्याला वाईट संगत मिळाली आहे. जोवर मी गोविंदाला मॅनेज करत होते तोवर मी त्याला फुलासारखं जपायचे. आता नवीन मॅनेजर आले आहेत पण गोविंदाचं स्टारडम आता संपलं आहे."

Web Title : गोविंदा को माफ करने के लिए सुनीता आहूजा ने रखी शर्त।

Web Summary : सुनीता आहूजा गोविंदा को माफ कर देंगी अगर वह सुधर जाते हैं और उनकी अपेक्षाओं को पूरा करते हैं। उन्होंने उनके कथित अफेयर और बेटे के करियर के लिए समर्थन की कमी को मुद्दे के रूप में बताया। वह उनके पुराने रूप को याद करती हैं।

Web Title : Sunita Ahuja sets condition for forgiving Govinda after feud.

Web Summary : Sunita Ahuja will forgive Govinda if he improves and meets her expectations. She cited his alleged affair and lack of support for their son's career as issues. She misses his old self.