सुनील ग्रोव्हरकडे नाही वेळ! छोट्या पडद्यावरच्या चाहत्यांना सोसावी लागणार कळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 12:24 IST2018-09-09T12:21:25+5:302018-09-09T12:24:06+5:30

टीव्हीवर ‘गुत्थी’, ‘डॉ़ मशहूर गुलाटी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील ग्रोव्हरने छोट्या पडद्याच्या चाहत्यांचे अपार मनोरंजन केले. आत्ताही छोट्या पडद्याच्या चाहत्यांना सुनीलच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. 

sunil grover wont be seen on tv till next year | सुनील ग्रोव्हरकडे नाही वेळ! छोट्या पडद्यावरच्या चाहत्यांना सोसावी लागणार कळ!

सुनील ग्रोव्हरकडे नाही वेळ! छोट्या पडद्यावरच्या चाहत्यांना सोसावी लागणार कळ!

कपिल शर्माचा एकेकाळचा जवळचा मित्र सुनील ग्रोव्हर सध्या सगळीकडे चर्चेत आहे. सध्या कपिल शर्मा इंडस्ट्रीत कुठेच नाही. पण सुनील ग्रोव्हरला मात्र उसंत नाहीये. टीव्हीवर ‘गुत्थी’, ‘डॉ़ मशहूर गुलाटी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील ग्रोव्हरने छोट्या पडद्याच्या चाहत्यांचे अपार मनोरंजन केले. आत्ताही छोट्या पडद्याच्या चाहत्यांना सुनीलच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. पण खरे सांगायचे तर टीव्हीवर परतायला सुनीलकडे अजिबात वेळ नाही. पुढील वर्षांपर्यंत तरी तो टीव्हीवर परतणारा नाही.
होय, चित्रपटांत बिझी असल्याने सुनीलच्या टीव्हीवरच्या चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या सुनील ग्रोव्हर सलमान खानसोबत ‘भारत’ चित्रपटाचे शूटींग करतोय. यात सुनीलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी जानेवारीपर्यंत सुनील या चित्रपटात बिझी आहे. नुकतेच त्याने ‘पटाखा’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले. विशाल भारद्वाज यांच्या या चित्रपटात सुनील ग्रोव्हर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सुनील याआधीही काही चित्रपटांत दिसला आहे. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण आता ‘भारत’ आणि ‘पटाखा’ या दोन दमदार चित्रपटातून सुनील ग्रोव्हर येतोय म्हटल्यावर काही काळ तरी त्याच्या छोट्या पडद्यावर परतण्याची प्रतीक्षा आपण करू शकतोच.
सुनील व कपिलच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. पण अचानक त्यांच्या भांडण झाल्याची बातमी आली आणि पुढे सुनीलने कपिलसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सर्वाधिक फटका कपिलला बसला. त्याच्या करिअरची गाडी यानंतर अशी काही घसरली की, अद्यापही ती रूळावर आलेली नाही.

Web Title: sunil grover wont be seen on tv till next year