"तुम्ही 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरसोबत जे.."; सुनील ग्रोव्हरचा तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न, लोकांची तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 15:23 IST2024-11-04T15:15:02+5:302024-11-04T15:23:08+5:30

सुनिल ग्रोव्हरने 'अ‍ॅनिमल' संदर्भात तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न विचारल्याने लोकांनी नाराजी प्रकट केलीय

sunil grover trolled after question tripti dimri about animal movie bold scene | "तुम्ही 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरसोबत जे.."; सुनील ग्रोव्हरचा तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न, लोकांची तीव्र नाराजी

"तुम्ही 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरसोबत जे.."; सुनील ग्रोव्हरचा तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न, लोकांची तीव्र नाराजी

'अ‍ॅनिमल' सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. सिनेमाचं कथानक, बोल्ड सीन्स अशा अनेक गोष्टी काहींना आवडल्या तर काहींनी नाराजी व्यक्त केली. आजही 'अ‍ॅनिमल' सिनेमातील अनेक प्रसंगांवर काही लोक आक्षेप घेताना दिसतात. 'अ‍ॅनिमल' सिनेमात तृप्ती डिमरीने साकारलेल्या भूमिकेची चांगलीच हवा झाली. सिनेमात रणबीर कपूरसोबत तृप्तीचे इंटिमेट सीन बघायला मिळाले. याच मुद्द्याला धरुन कपिल शर्मा शोमध्ये तृप्ती डिमरीला सुनिल ग्रोव्हरने विचित्र प्रश्न विचारला. त्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.  

तृप्ती डिमरीला सुनिलचा विचित्र प्रश्न

द ग्रेट इंडिया कपिल शो सध्या नेटफ्लिक्सवर सुरु आहे. या शोमध्ये 'भूल भूलैय्या ३' चे स्टारकास्ट सहभागी झाली होती. त्यावेळी भूल भूलैय्या ३ मध्ये काम करणारी तृप्ती डिमरीही या शोमध्ये सहभागी झालेली. तृप्ती डिमरीला सुनीलने शोमध्ये विचारलं की, "तुम्हीच आहात की ज्यांनी 'अ‍ॅनिमल' सिनेमात काम केलंय." तृप्ती या प्रश्नाला होकार देते. पुढे सुनिल तिला विचारतो की, "तुम्ही जे रणबीर कपूरसोबत केलं मला अपेक्षा आहे की हे फक्त शूटिंग वगैरे असेल. खरंखुरं यात काही नव्हतं ना." असा प्रश्न विचारल्यावर तृप्ती नकार देते. सुनिलच्या या प्रश्नावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. 

नेटकऱ्यांची सुनिलवर तीव्र नाराजी

'अ‍ॅनिमल'मधील बोल्ड सीनविषयी तृप्तीला असा विचित्र प्रश्न विचारल्याने नेटकऱ्यांनी सुनिलवर नाराजी व्यक्त केलीय. एका युजरने लिहिलंय की, "बॉलिवूड कधी नाही बदलणार." आणखी एका युजरने लिहिलंय की, "तृप्ती खूप प्रेमळ आणि शांत आहे. तिने हा प्रश्न खूप खेळकरपणे हाताळलाय. असा निगेटिव्ह प्रश्न तुम्ही अनन्या किंवा जान्हवीला विचारणार का?" आणखी एका युजरने लिहिलंय की, "डफलीने हा सवाल रणबीर कपूरला का नाही विचारला?" अशाप्रकारे लोकांनी द ग्रेट इंडिया कपिल शोच्या मेकर्सवर आणि सुनिल ग्रोव्हरवर नाराजी प्रकट केलीय. 

Web Title: sunil grover trolled after question tripti dimri about animal movie bold scene