सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:25 IST2025-07-26T11:23:35+5:302025-07-26T11:25:32+5:30

Hera Pheri 3 Movie : दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा 'हेरा फेरी ३' हा चित्रपट बऱ्याच काळापासून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण याआधी परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते या चित्रपटाचा भाग झाले आहेत.

Suniel Shetty reacted to Paresh Rawal's entry in 'Hera Pheri 3', said- ''It's eye-catching...'' | सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांचा 'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3 Movie) हा चित्रपट बऱ्याच काळापासून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण याआधी परेश रावल (Paresh Rawal) यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते या चित्रपटाचा भाग झाले आहेत. अभिनेता सुनील शेट्टी(Suniel Shetty)ने एका मुलाखतीत चित्रपट आणि सहअभिनेत्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटात सुनील शेट्टीने श्यामची भूमिका साकारली आहे. परेश रावल बाबू भैयाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. सुनील शेट्टीने मीम्सवरही प्रतिक्रिया दिली.

सुनील शेट्टीने 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, '''हेरा फेरी' चित्रपटातील सर्व विनोद प्रियदर्शनने लिहिले होते, आम्ही फक्त थोडेसे इम्प्रोव्हाइज करायचो. पण हे सर्व विनोद त्याने लिहिले आहेत. प्रत्येक शब्द त्याने लिहिलेला आहे. मी प्रियदर्शनसारखा दिग्दर्शक कधीही पाहिला नाही. विनोदाच्या दृष्टिकोनातून, तो ते पाहतो जे तुम्ही आणि मी ऐकू शकत नाही आणि पाहू शकत नाही. तो विनोदात एक प्रतिभाशाली आहे.''

सुनील शेट्टीने परेश रावल यांच्या कमबॅकवर दिली प्रतिक्रिया
सुनील शेट्टीने परेश रावल यांच्या चित्रपटातल्या एन्ट्रीच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याने म्हटले की, ''हो, हो, ते तिथे आहेत. मी खूप उत्साहित आहे. मी म्हटल्याप्रमाणे, मी फक्त रिलीजच्या दिवशीच बोलेन कारण वाईट नजर लागते. कधीकधी आपल्याला स्वतःची चांगली वाईट नजर लागते.'' अभिनेत्याने सांगितले की मुलं त्याला फक्त श्यामच्या भूमिकेत ओळखतात. ''जर एखादी आई ८ वर्षांच्या मुलाला विचारते की त्याने मला ओळखले का, तर तो मला ओळखत नाही. हेरा फेरीचे नाव घेतल्यानंतर तो हसतो. मला सुनील शेट्टी म्हणून नव्हे तर हेरा फेरी श्याम म्हणून ओळखला जातो.''

''आजचे चित्रपट व्हॉट्सअ‍ॅप जोक्ससारखे झालेत''
सुनील शेट्टीने चित्रपटसृष्टीतील विनोदाच्या सध्याच्या परिस्थितीवर पुढे म्हटले, ''हेरा फेरी हा विनोद नाही. हेरा फेरी ही एक परिस्थिती आहे. जर माझे आयुष्य फाटले असेल तर ते फाटले आहे. मी त्यात कोणते संवाद बोलू. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे ही ओळ मजेशीर बनते. आजचे चित्रपट व्हॉट्सअ‍ॅप जोक्ससारखे झाले आहेत. खरे लेखन नाही.''

Web Title: Suniel Shetty reacted to Paresh Rawal's entry in 'Hera Pheri 3', said- ''It's eye-catching...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.