Wedding Bells:लेक सासरी जाणार म्हणून भावुक झाला सुनील शेट्टी, ग्रॅण्ड व्हेडिंगची सुरू आहे जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 19:37 IST2022-05-03T18:59:14+5:302022-05-03T19:37:54+5:30
अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul)गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Wedding Bells:लेक सासरी जाणार म्हणून भावुक झाला सुनील शेट्टी, ग्रॅण्ड व्हेडिंगची सुरू आहे जय्यत तयारी
अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul)गेल्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतीच बातमी आली होती की हे कपल डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. दरम्यान, या कपलच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये अथियाचे वडील आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल खूप भावूक असल्याचे सांगण्यात आले आहे. सुनील शेट्टीला मुलीच्या लग्नात सगळं काही परफेक्ट हवंय.
बॉलिवूडलाइफ डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, अभिनेता सुनील शेट्टी मुलीच्या लग्नासाठी खूप भावूक झाला आहे. या लग्नासाठी तो खूप आनंदी आणि उत्साहित देखील आहे. रिपोर्टनुसार, सुनीलला आपल्या मुलीचे लग्न अतिशय ग्रँड पद्धतीने करायचे आहे आणि वडिलांच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे.
ग्रँड वेडिंगची तयार सुरू
सुनील शेट्टीने डिसेंबरमध्ये होणाऱ्या आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. सुनीलने अथियाच्या लग्नासाठी सर्वोत्कृष्ट हॉटेल्स, केटरर्स आणि डिझायनर बुक केले आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर अथिया आणि केएलचे लग्न जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. या लग्नाला क्रिकेटपासून ते बॉलिवूड स्टार्सही हजेरी लावणार आहेत.
सुनीलच्या वडिलांना अथियाचे लग्न बघायचे होते
सुनील शेट्टीला आपल्या मुलीच्या लग्नाचा आनंद लुटायचा आहे. अभिनेत्रीच्या अगदी जवळ असलेल्या अथियाच्या आजोबांनाही तिचे लग्न बघायचे होते, पण ते होऊ शकले नाही. रिपोर्टनुसार, सुनील शेट्टी यावेळी खूप भावूक आहे आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अथिया-केएल दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.