सुहाना पोहोचली करण जोहरच्या घरी? ही बॉलिवूड डेब्यूची तयारी तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 12:29 IST2017-04-21T06:58:12+5:302017-04-21T12:29:16+5:30

शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. सुहानाला अभिनेत्री बनायचे आहे, असे शाहरूख बोलता बोलता अनेकदा बोलून ...

Suhana reached Karan Johar's house? Is not it a Bollywood debut? | सुहाना पोहोचली करण जोहरच्या घरी? ही बॉलिवूड डेब्यूची तयारी तर नाही?

सुहाना पोहोचली करण जोहरच्या घरी? ही बॉलिवूड डेब्यूची तयारी तर नाही?

हरूख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. सुहानाला अभिनेत्री बनायचे आहे, असे शाहरूख बोलता बोलता अनेकदा बोलून गेला आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही सुहानाचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. या व्हिडिओमधील सुहानाची अ‍ॅक्टिंग स्किलही तुम्ही पाहिलीय. अ‍ॅक्टिंगच्या बाबतीत सुहाना डॅडी कूलपेक्षा जराही कमी नाही, हेच या व्हिडिओवरून दिसले होते. यानंतर सुहानाला मोठ्या पडद्यावर पाहण्यास सगळेच उत्सूक आहेत. पण कदाचित आपल्याला फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. होय, सुहाना काल-परवा करण जोहरच्या घराबाहेर दिसली. नेमक्या याचवेळी सिद्धार्थ मल्होत्राही करणच्या घराबाहेर स्पॉट झाला.





एनी गेस? होय, आमच्याही डोक्यात नेमके हेच आलेय. करण जोहरच्या घरी सुहाना आणि सिद्धार्थचे एकाचवेळी स्पॉट होणे, सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी तर नसेल? असे असेल तर निश्चित बॉलिवूड प्रेमींसाठी ही इंटरेस्टिंग न्यूज आहे. सुहाना आणि सिद्धार्थची जोडी बिग स्क्रीनवर कशी दिसेल, जरा कल्पना करा?





ALSO READ : शाहरूख खानची मुलगी सुहानाचा ‘सिंड्रेला’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

 सुहाना माझ्यापेक्षा पाच पटीने काम करण्याची तयारी ठेवत असेल आणि त्यानंतर दहा पटीने कमी मानधन घेण्यास तयार असेल तर ती अभिनेत्री बनू शकते. अभिनेत्रींना होताना प्रत्येक संकटाचा सामना करायला हवा. माझ्या सहयोगी अभिनेत्री ज्या पद्धतीने स्ट्रगल करून स्वत:ला सिद्ध करतात अगदी त्याच पद्धतीने तिनेही त्या सर्व अडचणींवर मात करणे अपेक्षित आहे. यासाठी जर तिची तयारी असेल तरच तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा विचार करावा, असे शाहरूखने म्हटले होते.  कदाचित सुहाना यासाठी अगदी तयार आहे. होय ना?

Web Title: Suhana reached Karan Johar's house? Is not it a Bollywood debut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.