वाढदिवसानिमित्त शाहरुख खानला लाडक्या लेकीने दिल्या खास शुभेच्छा; शेअर केले अनसीन फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:09 IST2023-11-02T12:06:22+5:302023-11-02T12:09:27+5:30

किंग खानची लाडकी लेक सुहाना खानने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली.

Suhana Khan wishes Shah Rukh Khan on his birthday | वाढदिवसानिमित्त शाहरुख खानला लाडक्या लेकीने दिल्या खास शुभेच्छा; शेअर केले अनसीन फोटो

वाढदिवसानिमित्त शाहरुख खानला लाडक्या लेकीने दिल्या खास शुभेच्छा; शेअर केले अनसीन फोटो

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. शाहरुख आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखच्या या खास दिवशी केवळ चाहतेच नाही तर तिचे इंडस्ट्रीतील मित्रही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. किंग खानची लाडकी लेक सुहाना खानने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

किंग खानच्या वाढदिवसाबाबत सुहाना खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर कधीही न पाहिलेले असे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुहाना आयपीएल मॅचदरम्यान वडिलांना मिठी मारताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये सुहाना आणि तिचा भाऊ आर्यन शाह रुखसोबत मस्ती करताना दिसत आहेत. या इन्स्टा स्टोरीमध्ये सुहानाने हॅप्पी बर्थडे डॅड असेही लिहिले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. 

सुहाना खान लवकरच फिल्मी दुनियेत पदार्पण करणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित आगामी 'द आर्चिज' सिनेमाच्या माध्यमातून किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. ती हटके लूक आणि बिनधास्त वावरामुळे सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सुहानाचा 'द आर्चिज' हा सिनेमा प्रसिद्ध कॉमिक्सवर आधारित आहे.  हा सिनेमा 7 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास., किंग खानसाठी २०२३ वर्ष हे खूप खास ठरलं. वर्षाच्या सुरवातीला 'पठाण' आणि त्यानंतर 'जवान' सिनेमाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आता त्याचा तिसरा चित्रपट 'डंकी' देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. आज शाहरुखच्या वाढदिवशी डंकीचा टीजर येऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
 

Web Title: Suhana Khan wishes Shah Rukh Khan on his birthday