सुहाना खानने शेअर केला लेटेस्ट ग्लॅमरस फोटो, फोटोपेक्षा कॅप्शनची होतेय जास्त चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 15:35 IST2021-02-25T15:21:21+5:302021-02-25T15:35:40+5:30
Suhana Khan shared the latest glamorous photo : सुहाना तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते.

सुहाना खानने शेअर केला लेटेस्ट ग्लॅमरस फोटो, फोटोपेक्षा कॅप्शनची होतेय जास्त चर्चा
शाहरुख खानची मुलगी सुहाना भलेही चित्रपटांपासून दूर आहे पण बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त चर्चेत असते. सुहानाचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सध्या मीडियावर व्हायरल होत असतात.
सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये असून ती तिचे शिक्षण पूर्ण करते आहे. सुहाना तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सुहानाच्या या पोस्टवर लिहिलेले कॅप्शने सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. हा फोटो शेअर करताना सुहानाने 'से चीज' असे कॅप्शन दिले आहे. सुहानाच्या या फोटोवर चाहते स्टनिंग आणि हॉट अशा कमेंट्स केल्या आहेत.
या फोटात सुहाना किचनमध्ये उभी आहे, जिथं कुकिंगचं सामानसुद्धा दिसतेय. सुहाना काय बनवतेय असा प्रश्न तिचे फॅन्स विचारतायेत. सुहानाने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेलं नाही, पण सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलोव्हिंगची संख्या 1.5 मिलियन आहे. सुहाना तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते.
त्याचबरोबर चाहत्यांना देखील तिचे फोटो खूप आवडतात. त्याच्या स्टायलिस लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते.