शाहरुखच्या लेकीचा 'सुहाना' सफर, न्यूयॉर्कमधील कॉलेजचा फोटो शेअर केला पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 17:57 IST2020-12-24T17:20:00+5:302020-12-24T17:57:04+5:30
सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये परतली आहे.

शाहरुखच्या लेकीचा 'सुहाना' सफर, न्यूयॉर्कमधील कॉलेजचा फोटो शेअर केला पण...
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आपल्या कुटुंबासमवेत मुंबईत क्वॉलिटी टाईम स्पेंट केल्यानंतर पुन्हा न्यूयॉर्कमध्ये शिकण्यासाठी परत गेली आहे. आपल्या सोशल अकाऊंटवरून लायब्ररीचा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “हे क्यूट होते.” मात्र, तिने आपल्या कमेंट बॉक्स लॉक केले आहे. सुहाना अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकते आहे.
किंग खानची मुलगी सुहाना खानदेखील वडिलांसारखी सोशल मीडियावरील लोकप्रिय सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सुहाना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
सुहाना तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते. त्याचबरोबर चाहत्यांना देखील तिचे फोटो खूप आवडतात. त्याच्या स्टायलिस लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिला चांगलं फॅन फॉलोईंग आहे.
शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते.
मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते.