"हा सिनेमा समाजात मोठा बदल घडवू शकतो...”, आमिर खानचा 'सितारे जमीन पर' पाहून सुधा मूर्ती काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:56 IST2025-06-10T16:55:16+5:302025-06-10T16:56:04+5:30

नुकतंच 'सितारे जमीन पर' सिनेमाचं खास स्क्रिनिंग पार पडलं. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती उपस्थित होत्या. सिनेमानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी 'सितारे जमीन पर' चित्रपटाचं विशेष कौतुक केलं.

sudha murthy praises aamir khan sitaare zameen par movie said it will make big change in society | "हा सिनेमा समाजात मोठा बदल घडवू शकतो...”, आमिर खानचा 'सितारे जमीन पर' पाहून सुधा मूर्ती काय म्हणाल्या?

"हा सिनेमा समाजात मोठा बदल घडवू शकतो...”, आमिर खानचा 'सितारे जमीन पर' पाहून सुधा मूर्ती काय म्हणाल्या?

आमिर खानचा बहुप्रतिक्षित 'सितारे जमीन पर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर'चा हा सीक्वल आहे. या सिनेमात आमिर खानसोबत १० नवोदित कलाकारांचा सहभाग आहे. प्रेरणादायी आणि भावनिक कथानक असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नुकतंच 'सितारे जमीन पर' सिनेमाचं खास स्क्रिनिंग पार पडलं. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती उपस्थित होत्या. सिनेमानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी 'सितारे जमीन पर' चित्रपटाचं विशेष कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, "हा सिनेमा डोळे उघडणारा आहे. अनेक लोक अशा मुलांना समजून घेत नाहीत. 'सामान्य' म्हणजे काय, हाच एक तत्त्वज्ञानात्मक प्रश्न आहे. पण या चित्रपटात या मुलांचं जीवन खूप सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. ते खूप संवेदनशील आणि निष्कलंक असतात. त्यांच्या जगण्याची पद्धत खूप सोपी असते आणि ते सदैव हसत असतात. एखाद्याला एखादं यश मिळालं तरी हे मुलं त्यामध्ये आनंद मानतात."

सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या, “या मुलांकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि या गोष्टी सिनेमात अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आल्या आहेत. हा सिनेमा खरोखर समाजात मोठा बदल घडवू शकतो आणि लोकांना बौद्धिक अपंगत्वाविषयी संवेदनशील बनवू शकतो. अशा मुलांना कमी समजू नये, ही जाणीव समाजात पोहोचवणं गरजेचं आहे.”

आमिर खान प्रॉडक्शन प्रस्तुत सितारे जमीन पर या सिनेमात आमिर खान आणि जिनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत. त्यासोबतच आरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भानसाली, आशीष पेंढसे, ऋषी शहाणी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे १० नवोदित कलाकारही आहेत. आर. एस. प्रसन्ना यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात संगीत शंकर-एहसान-लॉय यांचं असून, गीतलेखन अमिताभ भट्टाचार्य यांनी केलं आहे. पटकथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आमिर खान आणि अपर्णा पुरोहित असून, सहनिर्माते बी. श्रीनिवास राव आणि रवी भगचंदका आहेत. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्ये २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: sudha murthy praises aamir khan sitaare zameen par movie said it will make big change in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.