...तर आज महिमाच्या जागी माधुरी असती 'परदेस'ची अभिनेत्री; बऱ्याच वर्षानंतर सुभाष घईंनी केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:45 PM2022-08-09T18:45:00+5:302022-08-09T18:45:00+5:30

Mahima choudhry: परदेस हा चित्रपट विसरणं कोणालाही शक्य नाही. हा चित्रपट केवळ हिट ठरला नाही तर यातील गाणी विशेष गाजली.

subhash ghai revealed this actress was the first choice for pardes know why mahima choudhry got the role | ...तर आज महिमाच्या जागी माधुरी असती 'परदेस'ची अभिनेत्री; बऱ्याच वर्षानंतर सुभाष घईंनी केला उलगडा

...तर आज महिमाच्या जागी माधुरी असती 'परदेस'ची अभिनेत्री; बऱ्याच वर्षानंतर सुभाष घईंनी केला उलगडा

googlenewsNext

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि महिमा चौधरी (Mahima Chaudhary) यांची मुख्य भूमिका असलेला परदेस (Pardes) हा चित्रपट विसरणं कोणालाही शक्य नाही. हा चित्रपट केवळ हिट ठरला नाही तर यातील गाणी विशेष गाजली. आजही या चित्रपटातील गाण्यांचा समावेश एव्हरग्रीन गाण्यांमध्ये केला जातो. या चित्रपटात महिमाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली होती. मात्र, या भूमिकेसाठी महिमाऐवजी अभिनेत्री माधुरी दिक्षितला पहिली पसंती देण्यात आली होती. चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई (subhash ghai) यांनी याविषयीचा खुलासा केला आहे.

सुपरहिट ठरलेल्या 'परदेस' या चित्रपटाला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने सुभाष घई यांनी 'अॅक्टिंग स्कूल व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनल'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटातील कास्टिंग कसं झालं हे सांगितलं. विशेष म्हणजे गंगा या भूमिकेसाठी प्रथम माधुरी दिक्षितची निवड करण्यात आली होती. यासाठी माधुरीने होकारही दिला होता. मात्र, ऐनवेळी माधुरीऐवजी महिमाला रिप्लेस करण्यात आलं.

"या चित्रपटाच्या सुरुवातीलाच मी माधुरी दिक्षितला कुसुम गंगाची स्टोरी आणि तिच्या भूमिकेविषयी सांगितलं होतं. माधुरीला सुद्धा ही स्टोरी खूप आवडली होती. ज्यावेळी माधुरीला मी हा चित्रपट ऑफर केला तेव्हा ती मुळातच एक फेमस स्टार होती. त्यामुळे या चित्रपटात तिलाच घ्यावं असं माझ्या सहकाऱ्यांनीही मला सांगितलं," असं सुभाष घई म्हणाले.

पुढे ते म्हणतात," पण ज्यावेळी मी त्यांना महिमाच्या निवडीमागचं कारण सांगितलं त्यावेळी त्यांना ते पटलं. एक तरुण गावातील भोळी मुलगी. जी फक्त आकाशात विमान पाहते आणि अमेरिकेत जाण्याचं स्वप्न पाहते. तिची मैत्रीणदेखील लग्न करुन तिथेच गेली असती. लग्न करुन अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पाहणारी ही तरुणी अत्यंत निरागस आहे. पण, तिच्यातील ही निरागसता मला कोणत्याही अभिनेत्रीमध्ये दिसली नाही. पण, एखादी नवोदित अभिनेत्री ही भूमिका नक्कीच छान करेल हा विश्वास होता. हाच विश्वास महिमाने खरा करुन दाखवला. तिचं निरागस हास्य आणि तिची उंची पाहून मी या चित्रपटात माधुरीऐवजी तिला कास्ट केलं. "

दरम्यान, ८ ऑगस्ट १९९७ रोजी परदेस हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात शाहरुख खान, आमरिश पुरी, हिमानी  शिवपुरी , आलोकनाथ, अपूर्व अग्नहोत्री असे अनेक कलाकार झळकले होते. हा चित्रपट आज २५ वर्षांनंतरही तितकाच लोकप्रिय असल्याचं पाहायला मिळतो.
 

Web Title: subhash ghai revealed this actress was the first choice for pardes know why mahima choudhry got the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.