‘स्टुडंट आॅफ द ईयर2’च्या सेटवर गंभीर अपघात; थोडक्यात बचावली चंकी पांडेची लेक अनन्या पांडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 09:54 IST2018-06-04T04:19:39+5:302018-06-04T09:54:57+5:30
अभिनेता चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्याचा ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ ...
.jpg)
‘स्टुडंट आॅफ द ईयर2’च्या सेटवर गंभीर अपघात; थोडक्यात बचावली चंकी पांडेची लेक अनन्या पांडे!
अ िनेता चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्याचा ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ हा चित्रपट रिलीज होतोय. सध्या अनन्या या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या सेटवर अनन्या थोडक्यात बचावल्याची खबर आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडे ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’च्या सेटवर एक गंभीर अपघात घडला. या अपघातातून अनन्या केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावली. त्याचे झाले असे की, एका सीनमध्ये अनन्याला ड्राईव्ह करताना सीन पूर्ण करायचा होता. पण अचानक अनन्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि तिची गाडी एका झाडावर जावून आदळली. या अपघातानंतर सगळ्यांचेच धाबे दणाणले. सगळेच गाडीकडे धावले. सुदैवाने अनन्याला यात कुठलीही दुखापत झाली नाही. अनन्या उत्तम ड्राईव्हिंग करते़ अशात तिचे गाडीवरचे नियंत्रण कसे सुटले, याचा विचार करून सेटवर उपस्थित लोक हैरान होते. दरम्यान या अपघातानंतर सेटवर कुठलाही अपघात होणार नाही, यासाठी एक स्पेशल युनिट टीम तैनात करण्यात आली आहे.
ALSO READ : ‘स्टुडेंट आॅफ द ईयर-२’च्या सेटवरील एक फोटो होतोय व्हायरल, तुम्हीही पाहा!
पुनीत मल्होत्रा हा चित्रपट दिग्दर्शित करतोय. टायगर श्रॉफ या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत अनन्या आणि तारा सुतारिया या दोघी आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहेत. हा चित्रपट २३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काम केले होते. या तिघांनी या चित्रपटाच्या माध्यमातूनच आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. आज हे तिन्ही स्टार्स इंडस्ट्रीमध्ये कमालीचे यशस्वी आहेत.