'स्टुडंट ऑफ द इयर २'चा ट्रेलर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 19:15 IST2019-04-05T19:15:00+5:302019-04-05T19:15:00+5:30
'स्टुडंट ऑफ द इयर २'चा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.

'स्टुडंट ऑफ द इयर २'चा ट्रेलर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा 'कलंक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर आता बहुचर्चित चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इयर २'चा ट्रेलर प्रदर्शित करण्याच्या तयारीत धर्मा प्रोडक्शन आहे. १२ एप्रिलला पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर २'चा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार असल्याचे समजते आहे.
पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, सध्या धर्मा प्रोडक्शन कलंक चित्रपटाच्या प्रदर्शनाला घेऊन खूप व्यग्र आहे. हा एक पीरियड ड्रामा असून यात वरूण धवन, आलिया भट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा व आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यानंतर आता धर्मा प्रोडक्शनचा आणखीन मोठा सिनेमा 'स्टुडंट ऑफ द इयर २'चा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. यात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे व तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. असेही बोलले जात आहे की या चित्रपटात हॉलिवूड स्टार विल स्मिथ कॅमियो करताना दिसू शकतो.
गेल्या वर्षी स्मिथ मुंबईला आला होता. त्यावेळी तो 'स्टुडंट ऑफ द इयर २'च्या अंधेरी येथील सेटवर बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकला होता. हे गाणे होते राधा तेरी चुनरी. ज्यात स्मिथने हिप हॉप डान्स केला होता. आता ट्रेलरवरून स्पष्ट होईल की, 'स्टुडंट ऑफ द इयर २'मध्ये विल स्मिथ दिसणार आहे की नाही.