'स्टुडंट ऑफ द ईयर ३'मध्ये कपूर घराण्यातील स्टारकिडची एन्ट्री, करण जोहरचा हा सिनेमा OTTवर होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:44 PM2023-07-20T15:44:26+5:302023-07-20T15:44:55+5:30

Karan Johar : करण जोहर लवकरच 'स्टुडंट ऑफ द इयर ३' घेऊन येणार आहे. या चित्रपटात एक नवीन स्टार किडची एंट्री होणार आहे.

'Student of the Year 3' entry of the star kid of the Kapoor family, Karan Johar's film to be released on OTT | 'स्टुडंट ऑफ द ईयर ३'मध्ये कपूर घराण्यातील स्टारकिडची एन्ट्री, करण जोहरचा हा सिनेमा OTTवर होणार रिलीज

'स्टुडंट ऑफ द ईयर ३'मध्ये कपूर घराण्यातील स्टारकिडची एन्ट्री, करण जोहरचा हा सिनेमा OTTवर होणार रिलीज

googlenewsNext

करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ द इयर ३' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडला अनेक नवे स्टार दिले, ज्यात आलिया भट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अनन्या पांडे यांसारख्या नावांचा समावेश आहे. आता करण लवकरच 'स्टुडंट ऑफ द इयर ३' घेऊन येणार आहे. या चित्रपटात एक नवीन स्टार किडची एंट्री होणार आहे. करण जोहरच्या या चित्रपटात कपूर घराण्याची मुलगी हिरोईन असणार आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मुळे चर्चेत आलेला करण जोहर लवकरच त्याच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या फ्रेंचाइजी चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही चित्रपटात नवे चेहरे दिसणार आहेत. कपूर घराण्याची लाडकी लेक करण जोहरची हिरोईन असणार आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या दोन्ही भागांना लोकांचे खूप प्रेम मिळाले, त्यामुळे पुन्हा एकदा करण चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, संजय कपूरची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर ३' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होऊ शकते.

'स्टुडंट ऑफ द इयर ३'मध्ये होणार नवीन एक्सपेरिमेंट!
चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट असेही समोर आले आहे की हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नाही तर OTT वर प्रदर्शित होणार आहे. असे म्हटले जात आहे की करण 'स्टुडंट ऑफ द इयर ३' वेब सीरिजमध्ये रूपांतरित करण्याच्या तयारीत आहे. जो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. म्हणजेच शनाया कपूरचे हे ओटीटी डेब्यू असेल.

Web Title: 'Student of the Year 3' entry of the star kid of the Kapoor family, Karan Johar's film to be released on OTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.