​दिल्लीच्या रस्त्यावर स्ट्रिट सिंगरला चीअर करताना दिसला यो यो हनी सिंह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 16:00 IST2018-01-01T07:34:31+5:302018-01-01T16:00:00+5:30

काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला हनी दिल्लीच्या रस्त्यावर एका स्ट्रिट सिंगरला चीअर करताना दिसला. दिल्लीच्या खान मार्केटमध्ये एका स्ट्रिट सिंगरला चीअर करतानाचा हनीचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे.

Streets singer on the streets of Delhi has seen a cheer yo yo honey lion! | ​दिल्लीच्या रस्त्यावर स्ट्रिट सिंगरला चीअर करताना दिसला यो यो हनी सिंह!

​दिल्लीच्या रस्त्यावर स्ट्रिट सिंगरला चीअर करताना दिसला यो यो हनी सिंह!

पर यो यो हनी सिंगह गत दोन वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब होता. पण आता हनी सिंग पुन्हा एकदा परतला आहे. आपल्या नव्या गाण्यासह हनीने जोरदार एन्ट्री घेतलीयं. सोशल मीडियावरही तो अ‍ॅक्टिव्ह झालायं. काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला हनी दिल्लीच्या रस्त्यावर एका स्ट्रिट सिंगरला चीअर करताना दिसला. दिल्लीच्या खान मार्केटमध्ये एका स्ट्रिट सिंगरला चीअर करतानाचा हनीचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. हनीने त्याच्या फेसबुक व इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. एक स्ट्रिट सिंगर गिटार वाजवत ‘मेरे रस्के कमर’ गाणे गातोय आणि हनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक करतोय, असे या व्हिडिओमध्ये दिसतेय.



काल परवाच यो यो हनी सिंगचे ‘चोरी साडा’ हे गाणे रिलीज झाले. हनीने twitterवर याची माहिती दिली होती. प्रतीक्षा संपलीय, हिंदी फ्युजनसह माझे भांगडा सॉन्ग आलेय, असे हनीने लिहिले होते.



एक काळ असा होता, जेव्हा सर्वांच्याच ओठांवर यो योची गाणी होती. पण यशाच्या शिखरावर असतानाच यो यो अचानक गायब झाला. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. पण यानंतर एका मुलाखतीत याकाळात त्याच्यासोबत काय काय घडले, हे हनीने जगासोबत शेअर केले होते.  बॉलिवूडमधून काही काळ  मी  गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती.  यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबुल केले होते.  बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलते. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्याचे मूड असते. याच आजारामुळे हनी सिंग मद्याच्या आहारी गेला. इतका की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले होते.

ALSO READ : ​बायोपिकसाठी यो यो हनी सिंगला मिळाली इतक्या कोटींची आॅफर!

Web Title: Streets singer on the streets of Delhi has seen a cheer yo yo honey lion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.