'स्त्री ३', 'मुंज्या २', 'भेडिया २' आणि बरंच काही! हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील आगामी सर्व सिनेमांची रिलीज डेट जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:40 IST2025-01-03T11:40:05+5:302025-01-03T11:40:57+5:30
मॅडॉक फिल्मसने पुढील चार वर्षांचं प्लॅनिग आताच केलं असून आगामी सर्व सिनेमांची घोषणा केलीय

'स्त्री ३', 'मुंज्या २', 'भेडिया २' आणि बरंच काही! हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील आगामी सर्व सिनेमांची रिलीज डेट जाहीर
२०२४ वर्ष मॅडॉक फिल्मसच्या हॉरर कॉमेडी यूनिव्हर्सने चांगलंच गाजवलं. २०२४ मध्ये रिलीज झालेले 'मुंज्या' आणि 'स्त्री २' या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम जिंकलं. या सिनेमांच्या वेगळ्या विषयाला प्रेक्षकांंचं चांगलं प्रेम मिळालं. काल मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मॅडॉक फिल्म्सने हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील आगामी सर्व सिनेमांची घोषणा रिलीज डेटसकट केलीय. त्यामुळे पुढील एक - दोन वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार, यात शंका नाही.
हे सिनेमे होणार रिलीज
मॅडॉक फिल्मसने आगामी सिनेमांची घोषणा केलीय. हे सिनेमे पुढीलप्रमाणे:
- थामा- दिवाळी २०२५
- शक्ती-शालिनी ३१ डिसेंबर २०२५
- भेडिया २ - १४ ऑगस्ट २०२६
- चामुंडा - ४ डिसेंबर २०२६
- स्त्री ३- १३ ऑगस्ट २०२७
- महा मुंज्या - २४ डिसेंबर २०२७
- पहला महायुद्ध- ११ ऑगस्ट २०२८
- दुसरा महायुद्ध - १८ ऑक्टोबर २०२८
Dinesh Vijan presents the genre-defining lineup of #MaddockHorrorComedyUniverse 8 theatrical films that will take you on a wild ride of laughter, spooks, thrills, and screams! #DineshVijan#MaddockHorrorComedyUniverse#Announcement#MaddockFilms#NewReleases#UpcomingMovies… pic.twitter.com/wCuAGL9pV9
— Maddockfilms (@MaddockFilms) January 2, 2025
अशाप्रकारे मॅडॉक फिल्मसने आगामी ८ सिनेमांची घोषणा केलीय. विशेष गोष्ट म्हणजे मॅडॉक फिल्मसचा आगामी ऐतिहासीक सिनेमा 'छावा' या वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे पुढची ४ वर्ष प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार यात शंका नाही.