विवाहसंस्थेवर अजूनही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:21 IST2016-01-16T01:19:58+5:302016-02-12T01:21:36+5:30
अभिनेत्री कोंकणा सेनशी तो पाच वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाला होता. त्यांना चार वर्षांचा हारून नावाचा गोंडस मुलगाही आहे. मात्र, महिनाभरापूर्वीच ...

विवाहसंस्थेवर अजूनही विश्वास
रणवीर शोरी व कोंकणा सेनमध्ये मतभेद असल्याची चर्चा होती. ते लवकरच विभक्त होतील, अशा अफवाही होत्या. मात्र त्यांनी याबाबत काहीच स्पष्टीकरण दिले नव्हते. अखेर त्यांनी विभक्त होत असल्याचे जाहीर करून सर्व अफवांना विराम दिला. 'लग्न किंवा विवाह' ही पूर्णपणे कौटुंबिक घटना असते, या थिमवर 'तितली' हा सिनेमा बेतला आहे. त्याबाबत तसेच अँरेंज मॅरेज या नव्या संकल्पनेबाबत विचारले असता रणवीर म्हणाले, ''माझे अँरेंज मॅरेंज नव्हते. तो पूर्णपणे कौटुंबिक सोहळा असतो आणि त्यावर माझा आजही विश्वास आहे.''
रणवीर व कोंकणा हे पाच वर्षांपूर्वी (२0१0) विवाहबंधनात अडकले. त्यानंतर ट्रॅफिक सिग्नल, मिक्स्ड डबल्स, आजा नचले आणि गौरहरी दास्तान द फ्रिडम फाईल या चित्रपटांत ते एकत्र दिसले होते. आता १६ ऑक्टोबरला रणवीरचा 'तितली' येतोय.