करिनाची अवस्था : टू बी आॅर नॉट टू बी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 12:42 IST2016-04-19T07:12:43+5:302016-04-19T12:42:43+5:30

चांगल्या चित्रपटात भूमिका मिळावी असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. परंतु कधीकधी अशी वेळ येते जेव्हा दोन चांगल्या चित्रपटांपैकी एकाची ...

State of Care: To Be and Not to Be | करिनाची अवस्था : टू बी आॅर नॉट टू बी

करिनाची अवस्था : टू बी आॅर नॉट टू बी

ंगल्या चित्रपटात भूमिका मिळावी असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. परंतु कधीकधी अशी वेळ येते जेव्हा दोन चांगल्या चित्रपटांपैकी एकाची निवड करावी लागते आणि दुसरा सोडावा लागतो.

अशीच काहीशी अवस्था करिना कपूरची सध्या झालेली आहे. तिच्यासमोर दोन चित्रपटांचा प्रस्ताव आहे. एक म्हणजे रिभू दासगुप्ता यांचा अद्याप नाव निश्चित न झालेला थ्रिलर सिनेमा आणि दुसरा रोहित शेट्टीचा ‘गोलमाल ४’.

तारखांचा मेळ बसत नाही म्हणून बेबोला दोन्हीपैकी एकाची निवड करण्याचा पेच आहे. असे म्हणतात की, दोन्ही चित्रपटांची कथा तिला आवडली असल्यामुळे कोणती सोडावी हे तिला कळत नाहीए.

सध्या तिचा ‘की आणि का’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता ‘उडता पंजाब’च्या प्रोमोशनसाठी वेळ द्यावा लागणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन करिना दोन्ही प्रस्तावांवर विचार करत आहे.

आमचं मत सांगायच, तर करिना तु जी भूमिका अद्याप केलेली नाही, असाच चित्रपट निवड.

Web Title: State of Care: To Be and Not to Be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.