...या स्टार्सची फ्लॉप सुरुवात; तरीही आज सुपरस्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 18:17 IST2017-06-28T12:47:55+5:302017-06-28T18:17:55+5:30

चित्रपटसृष्टीत नाव कमविणे म्हणावे तेवढे सोपे नाही. गॉडफादर असो वा नसो, इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी दमदार अभिनयाबरोबरच कष्ट ...

... the start of this star; Still superstar today! | ...या स्टार्सची फ्लॉप सुरुवात; तरीही आज सुपरस्टार!

...या स्टार्सची फ्लॉप सुरुवात; तरीही आज सुपरस्टार!

त्रपटसृष्टीत नाव कमविणे म्हणावे तेवढे सोपे नाही. गॉडफादर असो वा नसो, इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी दमदार अभिनयाबरोबरच कष्ट करण्याची अपार क्षमता असायलाच हवी. जो यामध्ये कमी पडतो, तो कायमचाच या रेसमधून मागे पडतो. त्यामुळे बरेचसे असे कलाकार आहेत, ज्यांचे अस्तित्व कुठेच जाणवत नाही; मात्र काही असेही कलाकार आहेत, ज्यांची सुरुवात फ्लॉपने झाली, मात्र आज ते इंडस्ट्रीत सुपरस्टार्स आहेत. एका सुपरहिट चित्रपटामुळे ते रातोरात सुुपरस्टार झाले. अशाच सुपरस्टार्सच्या प्रवासाचा आढावा घेणारा हा वृत्तांत...



अमिताभ बच्चन
१९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून डेब्यू करणाºया महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुुपरस्टार्सचा प्रवास खूपच रंजक असा आहे. कारण सुरुवातीचे एका पाठोपाठ एक चित्रपट अपयशी ठरत असताना, त्यांनी कधीच निराश होऊन स्वत:ला इंडस्ट्रीपासून दूर नेले नाही. उलट ते जिद्दीने स्वत:ला सावरत नव्या आव्हानाला सामोरे जात होते. ‘आनंद’ आणि ‘परवाना’ या चित्रपटात काम करीत असताना त्यांना खूप अपेक्षा होत्या. ‘आनंद’साठी तर त्यांना फिल्मफेअरही मिळाला होता. परंतु कमाईच्या बाबतीत हे चित्रपट फारसा करिष्मा दाखवू शकले नव्हते. पुढे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी १९७३ मध्ये ‘जंजीर’ची निर्मिती केली. या चित्रपटाने बॉलिवूडमधील रोमॅण्टिक चित्रपटाचा ट्रेंडच बदलून टाकला. येथूनच ‘अ‍ॅग्री यंग मॅन’च्या सुपरस्टार करिअरचा प्रवास सुरू झाला. 



श्रीदेवी

तेलगू इंडस्ट्रीमध्ये लहानपणापासून काम करणाºया श्रीदेवीने १९६७ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. पुढे १९७९ मध्ये तिने ‘सोल्वॉँ सावन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला; मात्र तरीदेखील तिच्याकडे स्ट्रगल अ‍ॅक्टर म्हणूनच बघितले जात होते. जेव्हा ती १९८३ मध्ये ‘हिम्मतवाला’ या चित्रपटात अभिनेता जितेंद्रसोबत झळकली तेव्हा तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. ‘नैनों में सपना’ या गाण्याने तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. येथूनच श्रीदेवीचा सुपरस्टारचा प्रवास सुरू झाला. 



अक्षयकुुमार
मार्शल आर्ट ट्रेनर, असिस्टंट फोटोग्राफर, बॅकग्राउंड डान्सर आणि मॉडल आदी क्षेत्रात काम केल्यानंतर १९९१ मध्ये अभिनेता अक्षयकुमार याने ‘सौगंध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले; मात्र हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. पुढे तो १९९२ मध्ये अब्बास मस्तान यांच्या ‘खिलाडी’ या चित्रपटात झळकला. त्यानंतर अक्षयचे करिअरच बदलून गेले. त्याला ‘खिलाडी’ अशी ओळख मिळाली. पुढे या चित्रपटाची सीरिज बनविण्यात आली. त्यामुळे अक्षयकडे सगळेच अ‍ॅक्शन हिरो म्हणून बघू लागले. 



शाहरूख खान
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याने १९८८ मध्ये टीव्हीवरून आपल्या करिअरला सुरुवात केली. पुढे त्याला १९९१ मध्ये ‘दीवाना’ या चित्रपटात संधी मिळाली. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट हिट ठरला; मात्र शाहरूखला त्याचा म्हणावा तेवढा फायदा झाला नाही. पुढे १९९३ मध्ये शाहरूखने दोन अ‍ॅण्टी हिरो म्हणून चित्रपट केले. त्यात ‘डर’ आणि ‘बाजीगर’ यांचा समावेश होता. या दोन्ही चित्रपटांनी शाहरूखला वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्याचा ‘क...क...क...किरण’ हा डायलॉग आजही फेमस आहे. 



आमीर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याने १९८४ मध्ये आलेल्या केतन मेहताच्या ‘होली’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. पुढे त्याने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले. आमीरच्या या चित्रपटांचे समीक्षकांनी कौतुकही केले. परंतु १९९५ मध्ये आमीरने वर्षातून केवळ दोन चित्रपट करणार असा निर्णय घेतल्याने, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. १९९६ मध्ये आलेल्या त्याच्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाने धूम उडवून दिली. यासाठी त्याला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला. यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही. 



ऐश्वर्या राय-बच्चन
आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाºया अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने खºया अर्थाने ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. मैत्रेयी देवीच्या बंगाली पुस्तकाचे रूपांतर असलेल्या या चित्रपटात ऐशचा अभिनय खूपच सरस राहिला. सलमान खानसोबतची तिची जोडी त्यावेळी खूपच चर्चिली गेली. 



करिना कपूर
करिना कपूर हिचीही बॉलिवूड सुरुवात काहीशी पडतझडत झाली; मात्र ‘रिफ्यूजी’ या चित्रपटाने तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पुढे २००७ मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही केले गेले. या चित्रपटाने तिला सुपरस्टारचा दर्जाही मिळवून दिला. 



कॅटरिना कैफ
हिंदी भाषेवर फारसे प्रभुत्व नसलेल्या कॅटरिना कैफला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स गमवाव्या लागल्या. २००५ मध्ये तिने राम गोपाल वर्माचा ‘सरकार’ हा चित्रपट केला. त्यामध्येही तिचा आवाज डब केला गेला; मात्र अशातही कॅटचा अभिनय लोकांना आवडला. २००७ मध्ये तिने ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटात विदेशी मुलीची भूमिका साकारली. ही भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. 

Web Title: ... the start of this star; Still superstar today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.