स्टार्सको गुस्सा क्यू आता है....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:44 IST2016-02-10T06:14:34+5:302016-02-10T11:44:34+5:30
बॉलिवूडमध्ये अनेक तारकांचा राग अनावर झाल्याने आपल्या चाहत्यांच्या श्रीमुखात लगावल्याची अनेक उदाहरणे आहेत. कित्येक तास आपल्या आवडत्या सिनेतारकांची वाट ...

स्टार्सको गुस्सा क्यू आता है....
2008 साली अभिनेता गोविंदा याने आपल्या एका चाहत्याच्या श्रीमुखात लगावली होती. आपल्यावर हा अन्याय असल्याचे सांगून तो चाहता थेट सुप्रीम कोर्टात पोहचला. सुप्रीम कोर्टाने यावर दिलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणी निकाल जाहीर करताना सुप्रीम कोर्टाने गोविंदाला चांगलेच सुनवले. गोविंदाने मोठ्या मनाने त्या चाहत्याला प्रत्यक्ष भेटून माफी मागावी व त्याबद्दल काही भरपाई द्यायची असेल, तर ती देखील त्याच्या हाती सोपवावी. सुप्रीम कोर्टाने अभिनेता गोविंदाला प्रायश्चित करण्यासाठी मंगळवारी शेवटची संधी दिली. आता गोविंदा माफ ी मागणार की पुन्हा अशीच मुजोरी करणार हे त्यालाच ठरवायचे आहे. यापूर्वी देखील अनेक स्टार्सनी आपल्या फॅ न्सच्या कानशीलात लगावल्याचे प्रसंग घडले आहेत.
.jpg)
अक्षय कुमार
स्टंट मॅन अक्षय कुमारच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. बॉलिवूडमध्ये त्याची प्रतिमा स्वच्छ असल्याचे मानले जाते. मात्र अक्षयकुमारने एका चाहत्याच्या श्रीमुखात लगावल्याची गोष्ट फारशी ठाऊक नाही. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गब्बर इज बॅक’च्या सेटवर शुटिंग पहायला आलेल्या अक्षयच्या एका चाहत्याने त्याची एक झलक पाहण्यासाठी शुटिंगच्या झोनमध्ये धाव घेतली. चाहत्याच्या हा उताविळपणा त्या अलगट आला. चिडलेल्या अक्षयने त्याच्या श्रीमुखात लगावली.

जेनीलिया डिसुझा-देशमुख
अभिनेत्री जेनिलिया डिसुझा-देशमुख हिने देखील एका चाहत्याच्या श्रीमुखात लगावली होती. आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे एका कार्यक्रमात एका चाहत्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने तिचा हातच पकडला होता असे सांगितले जाते. यामुळे जेनेलिया चिडली. चाहत्याने बोलायचे सोडून चक्क हात पकडल्याने तिने थेट त्याच्या कानशीलात लगावली. या प्रकारामुळे ती चांगलीच तापली होती.
.jpg)
जॉन अब्राहम
जॉन अब्राहमची एक झलक पाहण्यासाठी तरुणीची गर्दी होते. मंगलोरमधील एक ा चाहतीचे प्रेम तिच्याच अलगट आले. मंगलोरमध्ये आयोजित या कार्यक्रमात एका तरुणीने गर्दीतून वाट काढत जॉनचा हात पकडला अन् जॉनच्या हाताचे चुंबन घेण्याऐवजी चक्क चावा घेतला. या प्रकारामुळे जॉन संतापला अन् त्याने त्या तरुणीच्या थोबाडीत मारली. एवढ्यावरच तो थांनला नाही तर आपल्या हाताकडे पाहून दोनदा तिचा गाल लाल केला.

प्रियंका चोपडा
प्रियंका चोपडा हिने आपल्या दिलखेचक अदांनी कित्येक तरुणांची मने काबीज केली आहे. तिला मोठी फॅन फॉलोर्इंग देखील आहे. मात्र तिच्या एका फॅनला आपल्या प्रेमाचा इजहार करणे महागात पडले. एका चित्रपटाचे शुटिंग आटपूून प्रियंका आपल्या व्हॅनिटीव्हॅनकडे जात असताना एक चाहता तिला आडवा झाला. आपल्या प्रेमाची कबुली देत असतानाच ती जाम भडकली. अनघ तिने कोणताही विचार न करता या चाहत्याच्या श्रीमुखात लगावली.