पंधरा वर्षानंतर इंग्लीश-विंग्लीश चित्रपटातुन पदार्पण करुन केवळ स्वत:च्या आभिनयाच्या बळावर नायकावीना चित्रपट ...
श्रीदेवीच्या चित्रपटाचे शुटिंग सुरु
/> पंधरा वर्षानंतर इंग्लीश-विंग्लीश चित्रपटातुन पदार्पण करुन केवळ स्वत:च्या आभिनयाच्या बळावर नायकावीना चित्रपट यशस्वी करुण दाखवलेल्या हरहुन्नरी श्रीदेवी लवकरच प्रेक्षेकांच्या भेटीला येणार आहे.याची घोषणा तीने तीची मुलगी जान्हवी कपुरच्या वाढदिवशी ट्विीट्रर द्वारे दिली. श्रीदेवी हिने तिची मुलगी जान्हवी हिच्या वाढदिवसाला हि गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. ८० च्या दशकामध्ये एस से बढकर एक चित्रपट देऊन श्रीदेवीने बॉलीवुडमध्ये तिचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. अनिल कपुर सोबत तिची जोडी तर हिट ठरली होती. त्यानंतर ती बोनी कपुर यांच्याशी विवाहबद्ध झाली अन या हवाहवाईने इंडस्ट्रीकडे जणु काही पाठच फिरवली. पंधरा वर्षांनंतर तिने इंग्लिश विंग्लीश या चित्रपटातून पुर्नागमन केले अन तिच्या चाहत्यांची मने जिंकली. आता श्रीदेवी पुन्हा तिचा जलवा मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. फक्त ती कोणत्या चित्रपटातून येणार आहे हे मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे.