​वधूप्रमाणे सजवले गेले आहे श्रीदेवी यांचे पार्थिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 12:38 IST2018-02-28T07:08:29+5:302018-02-28T12:38:29+5:30

वधूप्रमाणे श्रीदेवी यांचे पार्थिव सजवण्यात आले आहे. त्यांना लाल रंगाची बनारसी साडी नेसवण्यात आली आहे. तसेच त्यांच्या भांगात कुंकू ...

Sridevi's body is decorated like a bride | ​वधूप्रमाणे सजवले गेले आहे श्रीदेवी यांचे पार्थिव

​वधूप्रमाणे सजवले गेले आहे श्रीदेवी यांचे पार्थिव

ूप्रमाणे श्रीदेवी यांचे पार्थिव सजवण्यात आले आहे. त्यांना लाल रंगाची बनारसी साडी नेसवण्यात आली आहे. तसेच त्यांच्या भांगात कुंकू भरण्यात आले आहे, त्यांचा मेकअप करण्यात आला आहे. लाल रंगाची लिपस्टिकही लावण्यात आली आहे. या सगळ्यामुळे त्या खूपच सुंदर दिसत आहेत. श्रीदेवी यांच्या सौंदर्यावर त्यांचे फॅन्स फिदा आहेत. श्रीदेवी यांच्या या अंतिम क्षणी देखील त्या तितक्याच सुंदर दिसत आहेत. श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रचंड आवडायचा. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटात पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांच्या अंतिम क्षणी त्यांना पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवावे असे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यामुळे त्यांचे पार्थिव पांढऱ्या मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजवले गेले आहे. 
मंगळवारी रात्री बोनी कपूर व अर्जुन कपूरसह इतर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने त्यांचे पार्थिव मुंबईत आणले गेले. मंगळवारी रात्री एअरपोर्टवर स्वतः अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर एअरपोर्टवर उपस्थित होते. 
श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सेलिब्रेशन क्लबमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा निघेल. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. 
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.  

Also Read : ​श्रीदेवी यांचे पार्थिव पाहून विद्या बालनला अनावर झाले अश्रू


Web Title: Sridevi's body is decorated like a bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.