श्रीदेवी पूर्ण करणार सिनेसृष्टीतील पन्नास वर्षे; बोनी कपूर करणार ‘खास’ सेलिब्रेशन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 17:13 IST2016-12-20T17:13:03+5:302016-12-20T17:13:03+5:30
येऊ घातलेले नवे वर्ष अभिनेत्री श्रीदेवीसाठी अतिशय खास असणार आहे. नव्या वर्षांत श्रीदेवीला चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण होणार आहे. ...

श्रीदेवी पूर्ण करणार सिनेसृष्टीतील पन्नास वर्षे; बोनी कपूर करणार ‘खास’ सेलिब्रेशन!!
य ऊ घातलेले नवे वर्ष अभिनेत्री श्रीदेवीसाठी अतिशय खास असणार आहे. नव्या वर्षांत श्रीदेवीला चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण होणार आहे. चित्रपटांच्या ग्लॅमरस दुनियेत ५० वर्षे पूर्ण करणे हे कुण्याही कलाकारासाठी मोठी उपलब्धी आहे. त्यातल्या त्यात श्रीदेवीचा सिनेसृष्टीतील प्रवास अनेक उपलब्धींसह खास राहिला आहे. त्यामुळेच पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीचे चित्रपटसृष्टीतील ५० वर्षे सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे. तेही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने.
होय, बोनी कपूर लवकरच ‘मॉम’ या आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे आणि या चित्रपटात श्रीदेवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मॉम’ हा बोनी कपूर यांच्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा आहे. नव्या वर्षांत याचे शूटींग सुरु होणार असल्याची खबर आहे. श्रीदेवीसह नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय कुमार हे दोघेही यात दिसणार आहे.
श्रीदेवी सध्या ५३ वर्षांची आहे. चार वर्षांची असतांनापासून तिने चित्रपटांमध्ये काम करणे सुरु केले. तिचा पहिला सिनेमा होता ‘कंधन करूणाई’. हा तामिळ सिनेमा १९६७ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०१७ मध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत. १९७५ मध्ये ‘जुली’ या हिंदी चित्रपटामध्ये श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. यानंतर १९७८ मध्ये ‘सोलहवां सावन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केले होते. श्रीदेवीने बॉलिवूडमधील आपल्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये ‘सदमा’, ‘नागीन’,‘निगाहें’,‘मिस्टर इंडिया’, ‘लम्हे’, ‘खुदा गवाह’, ‘जुदाई’,असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
१९९७ मध्ये श्रीदेवी ‘जुदाई’मध्ये दिसली. त्यानंतर तब्बल १५ वर्षांच्या ब्रेकनंतर तिचा ‘इंग्लिश-विंग्लिश’ हा सिनेमा आला. हा चित्रपटही हिट राहिला.