श्रीदेवी यांच्या डोक्यावर आहेत जख्माच्या खुणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 14:51 IST2018-02-27T09:21:36+5:302018-02-27T14:51:36+5:30
श्रीदेवी यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला असल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. पण त्याचसोबत एशियानेटने एक वेगळेच वृत्त दिले ...

श्रीदेवी यांच्या डोक्यावर आहेत जख्माच्या खुणा?
श रीदेवी यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला असल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. पण त्याचसोबत एशियानेटने एक वेगळेच वृत्त दिले आहे. एशियानेटच्या वृत्तानुसार श्रीदेवी यांच्या डोक्यावर जख्मांच्या खुणा आहेत. तसेच त्यांच्या शरीरावर देखील जख्माच्या काही खुणा असल्याचे त्यांनी त्यांच्या बातमीमध्ये म्हटले आहे. कालपर्यंत आलेल्या अहवालामध्ये कुठेच श्रीदेवीच्या अंगावर आणि डोक्यावर जख्माच्या खुणा असल्याचे म्हटले गेले नव्हते. पण एशियानेटने दिलेल्या बातमीमुळे या प्रकरणाला चांगलेच वळण मिळाले आहे.
श्रीदेवी यांचे पार्थिव रविवारपर्यंत मुंबईत येईल असे म्हटले जात होते. पण अद्यापही ते कपूर कुटुंबियाच्या स्वधीन करण्यात आलेले नाही. आता तर श्रीदेवी यांच्या फोन रेकॉर्डची तपासणी केली जाणार आहे. तसेच श्रीदेवी यांचे जुने मेडिकल रिपोर्ट देखील भारतातून मागवण्यात आले आहेत. श्रीदेवी यांच्यावर कोणते उपचार सुरू होते का याविषयी देखील ते जाणून घेणार आहेत. तसेच त्यांनी केलेल्या सर्जरीचे देखील रिपोर्ट मागण्यात आले आहेत. या सगळ्याचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का याची तपासणी देखील पोलिस करणार आहेत.
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.
श्रीदेवी यांनी १९७८ ला सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या.
Also Read : वडिलांना आधार द्यायला अर्जुन कपूर दुबईला रवाना