श्रीदेवीने नाकारलेल्या सिनेमातून 'धकधक गर्ल'चं उजळलं नशीब, सिनेमा झाला ब्लॉकबस्टर, माधुरी बनली सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:28 IST2025-06-23T18:27:41+5:302025-06-23T18:28:11+5:30

Sridevi : श्रीदेवीने एक चित्रपट नाकारला जो नंतर सुपरहिट ठरला आणि त्या चित्रपटाला ५ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.

Sridevi rejected film Beta but Madhuri Dixit grabbed and became superstar | श्रीदेवीने नाकारलेल्या सिनेमातून 'धकधक गर्ल'चं उजळलं नशीब, सिनेमा झाला ब्लॉकबस्टर, माधुरी बनली सुपरस्टार

श्रीदेवीने नाकारलेल्या सिनेमातून 'धकधक गर्ल'चं उजळलं नशीब, सिनेमा झाला ब्लॉकबस्टर, माधुरी बनली सुपरस्टार

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ने तिच्या सिने कारकिर्दीत एका चित्रपटात काम केले ज्यामुळे तिचे नशीब बदलले. ही अभिनेत्री सुपरस्टार बनली आणि या चित्रपटाने ५ फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले. श्रीदेवी (Sridevi) आणि माधुरी दीक्षित दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. या काळात, अशी एक घटना घडली की श्रीदेवीच्या नाकारलेल्या चित्रपटांपैकी एका सिनेमाने माधुरी दीक्षितला सुपरस्टार बनवले. तो चित्रपट दुसरा तिसरा तिसरा कोणता नसून बेटा (Beta Movie) आहे. या चित्रपटात, धकधक गर्ल अनिल कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. अरुणा ईराणी यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.

बोनी कपूर यांना बेटा चित्रपटात श्रीदेवीने मुख्य भूमिका करावी अशी इच्छा होती पण अभिनेत्रीने नकार दिला. त्यानंतर इंदर कुमारने चित्रपटाचे तमीळ हक्क घेतले आणि माधुरी दीक्षितला मुख्य अभिनेत्री म्हणून साइन केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वहिदा रहमान, शर्मिला टागोर आणि माला सिन्हा यांना सासूच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले. परंतु त्यांच्या नकारानंतर, ही भूमिका अरुणा ईराणी यांनी साकारली. अरुणा ईराणीसाठी हा चित्रपट खूप लकी ठरला. हा चित्रपट तिच्या सिने कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट होता.

सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई
श्रीदेवीने बेटा सिनेमा नाकारल्यामुळे माधुरी दीक्षित सुपरस्टार बनली. या चित्रपटासाठी दोन्ही मुख्य कलाकारांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले. याशिवाय, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेटा हा १९९२ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्याने २३.५० कोटी रुपयांचं कलेक्शन केले होते.

Web Title: Sridevi rejected film Beta but Madhuri Dixit grabbed and became superstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.