सुंदर दिसण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केल्या तब्बल २९ शस्त्रक्रिया, नाव ऐकून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:32 IST2025-06-12T13:31:59+5:302025-06-12T13:32:27+5:30
गेल्या काही वर्षांत सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत.

सुंदर दिसण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केल्या तब्बल २९ शस्त्रक्रिया, नाव ऐकून थक्क व्हाल!
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सौंदर्यामुळे लाखोंच्या मनावर राज्य करतात. बॉलिवूडमध्ये दिसणं हे करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचा असतं. वय वाढलं तरी यंग आणि परफेक्ट दिसणं अपेक्षित असतं. त्यामुळेच अनेक अभिनेत्री सर्जरी किंवा कॉस्मेटिक उपचार करून स्वतःला अपग्रेड करत असतात. बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री, जिने आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी एक-दोन नव्हे तर २९ शस्त्रक्रिया केल्या. तर ती अभिनेत्री कोण आहे? ते जाणून घेऊयात.
एक अभिनेत्री होती, जिने केवळ पडद्यावरच नव्हे तर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्या म्हणजे श्रीदेवी. तिचं सौंदर्य, डान्स आणि अभिनय इतकं प्रभावी होतं की अनेक स्टार हिरो त्यांच्या तारखांची वाट पाहत असत. त्या काळात बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांना श्रीदेवीसोबत काम करायची संधी मिळावी, म्हणून वाट पाहावी लागायची. एखाद्या नायिकेला पुरुष कलाकारांइतकी लोकप्रियता मिळणं, हे त्या काळात दुर्मीळ होतं, पण श्रीदेवीने हे सिद्ध करून दाखवलं. श्रीदेवीने हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अपार लोकप्रियता मिळवली होती. त्यांचं स्टारडम एवढं प्रचंड होतं की, त्या 'लेडी अमिताभ' म्हणून ओळखल्या जायच्या.
बॉलिवूडमध्ये त्यांनी २० वर्षांहून अधिक काळ आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीला आकर्षित केलं. श्रीदेवी यांच्याबद्दलची अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे त्यांनी सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी २९ शस्त्रक्रिया केल्या होत्या, असं बोललं जातं. यामध्ये लेसर स्किन सर्जरी, सिलिकॉन ब्रेस्ट ट्रीटमेंट, फेस लिफ्ट यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी लिप सर्जरी देखील केली होती. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवीचे निधन झालं होतं.