श्रीदेवीने आपल्या दोन्ही मुलींचे असे टोपणनाव ठेवले होते, जे वाचून तुम्ही भावुक व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 17:18 IST2018-02-27T10:37:59+5:302018-02-27T17:18:13+5:30

सुपरस्टार श्रीदेवी या त्यांच्या खासगी आयुष्यात खूपच प्रेमळ व्यक्ती म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींचे असे नाव ठेवले ...

Sridevi had given the nickname of her two daughters, which you will be passionate about! | श्रीदेवीने आपल्या दोन्ही मुलींचे असे टोपणनाव ठेवले होते, जे वाचून तुम्ही भावुक व्हाल!

श्रीदेवीने आपल्या दोन्ही मुलींचे असे टोपणनाव ठेवले होते, जे वाचून तुम्ही भावुक व्हाल!

परस्टार श्रीदेवी या त्यांच्या खासगी आयुष्यात खूपच प्रेमळ व्यक्ती म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींचे असे नाव ठेवले होते, ज्यावरून त्यांच्यातील प्रेमळवृत्ती लगेचच लक्षात येते. पती बोनी कपूर आणि आपल्या दोन्ही मुलींबद्दल श्रीदेवींचे नाते खूपच हळवे आणि जवळीकतेचे होते. त्यामुळे श्रीदेवी यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवाराला त्यातून सावरणे मुश्किल होत आहे. श्रीदेवी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमीच आपल्या दोन्ही मुलींचे लहानपणींचे फोटो शेअर करायच्या. त्यामध्ये त्यांचे काही फॅमिली फोटोज्देखील असायचे. 



श्रीदेवी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, लग्नानंतर मी अभिनय सोडणार. कारण लग्नानंतर मला मुलांचा सांभाळ करायचा आहे. त्यावेळी श्रीदेवी यांनी हेदेखील म्हटले होते की, त्यांना लहान मुले खूप आवडतात. श्रीदेवी त्यांची मोठी मुलगी जान्हवीला प्रेमाने ‘कुच्चू’ आणि लहान मुलगी खुशीला ‘खुशलू’ या टोपणनावांनी बोलावित असत. श्रीदेवी यांनी खुशीच्या वाढदिवसानिमित्त थ्रोबॅक फोटो शेअर करताना लिहिले होते की, ‘खुशलू लव यू, तू माझे आयुष्य आहेस, माझी सासू आहेस, माझी खुशी आहेस, माझी हिम्मत आहेस, तुझे दिवस आनंदी जावोत.’



एका मुलाखतीत श्रीदेवी यांनी याविषयीचा उल्लेख केला होता की, आजदेखील माझ्या मुली जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्या घरी परत येईपर्यंत मी चिंतेत असते. आउटिंगपासून ते बºयाचशा इव्हेंट्समध्ये श्रीदेवी अधिकाधिक वेळ आपल्या परिवारासमवेत व्यतीत करणे पसंत करायच्या. श्रीदेवी यांनी म्हटले होते की, मला पार्टीत जाणे पसंत नसून, परिवारासमवेतच वेळ घालवणे आवडते. श्रीदेवी यांचे व्यक्तिगत जीवनही खूपच चढ-उताराने भरलेले होते. श्रीदेवी यांनी प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते. श्रीदेवी बोनी यांच्या दुसºया पत्नी होत्या. बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात वेडे झाले होते. त्यामुळेच त्यांनी पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट देत श्रीदेवींसोबत लग्न केले होते. 

Web Title: Sridevi had given the nickname of her two daughters, which you will be passionate about!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.