​अक्षयचा ‘गोल्ड’ असणार स्पोटर्स ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 21:43 IST2016-11-15T21:40:49+5:302016-11-15T21:43:54+5:30

बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा 15 आॅगस्ट 2018 साली प्रदर्शित होणाºया ‘गोल्ड’ या चित्रपटाची तुलना ‘चख दे इंडिया’ या चित्रपटाशी ...

Sports 'Drama' to be 'Gold' | ​अक्षयचा ‘गोल्ड’ असणार स्पोटर्स ड्रामा

​अक्षयचा ‘गोल्ड’ असणार स्पोटर्स ड्रामा

ong>बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा 15 आॅगस्ट 2018 साली प्रदर्शित होणाºया ‘गोल्ड’ या चित्रपटाची तुलना ‘चख दे इंडिया’ या चित्रपटाशी के ली जात आहे. मात्र ‘चख दे इंडिया’पेक्षा आपला चित्रपट वेगळा असेल असे अक्षयने सांगितले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हॉकीमध्ये मिळविलेल्या पाहिला सुवर्णपदकावर आधारित हा चित्रपट आहे. 

दिग्दर्शक शमीत अमीन यांच्या ‘चक दे इंडिया’ हा हॉकीवर बनवलेला सर्वोत्तम चित्रपट मानला जातो. मात्र अक्षय कुमारने हॉकीवर आधारित गोल्ड या चित्रपटाची घोषणा केल्याने तो ‘चख दे’ सारखाच असले असे सांगण्यात येत आहे, मात्र यात एक ट्विस्ट असल्याने गोल्डची तुलना कोणत्याच चित्रपटाशी करता येणार नाही असे अक्षय म्हणणे आहे.  भारतीय हॉकी टीमने 1948 मध्ये लंडन आॅलपिंकमध्ये सुवर्ण पदक मिळविले होते. या घटनेवर  दिग्दर्शक रिमा कागती ‘गोल्ड’ या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. यात अक्षयची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात अक्षय हॉकी स्टार बलबीर सिंगची भमिका साकारणार आहे. 

दिग्दर्शिका रिमा कागती हिने या चित्रपटाबद्दलची माहिती दिली. हा सिनेमा केवळ खेळाभोवतीच आणि सुवर्ण पदकापुरताच नसून यात सिनेमाला आवश्यक असणाºया अन्य गोष्टींचा देखील समावेश केला जाणार आहे. सिनेमा केवळ खेळापुरता असेल तर त्यात मजा नाही, सिनेमात ड्रामा असायलाच हवा. आम्ही ज्या घटनाक्रमावर सिनेमा तयार करीत आहोत, त्याबद्दल फारशी माहिती नाही. मात्र ड्रामा आमच्या चित्रपटाला मजबूत कथानक देईल. ही संकल्पना गीतकार अंकुर तिवारी यांनी दिल्यावर आम्ही राजेश देवराज यांच्याकडून संहिता लिहून घेतली. असेही रिमाने सांगिलते.

Web Title: Sports 'Drama' to be 'Gold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.