रफ्तार म्हणतो, हनी सिंहसोबत कधीही काम करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 17:54 IST2016-06-05T12:24:55+5:302016-06-05T17:54:55+5:30
‘माफिया मुन्डीर’ या ग्रूपच्या माध्यमातून अनेक हिट गाणी देऊनन संगीतप्रेमींचे मनोरंजन करणारा रॅपर रफ्तार यांच्या वाटा आता पूर्णत: वेगळ्या ...

रफ्तार म्हणतो, हनी सिंहसोबत कधीही काम करणार नाही
‘ ाफिया मुन्डीर’ या ग्रूपच्या माध्यमातून अनेक हिट गाणी देऊनन संगीतप्रेमींचे मनोरंजन करणारा रॅपर रफ्तार यांच्या वाटा आता पूर्णत: वेगळ्या आहेत. यापुढे हनी सिंहसोबत कधीही काम करणार नाही, असे रफ्तारने म्हटलेयं.‘लुंगी डान्स’च्या हिटमेकरसोबत काम करण्यात मला जराही स्वारस्य उरलेले नाही, असे रफ्तारने म्हटलेयं. तू आणि बादशहा भविष्यात हनी सिंहसोबत काम करणार का? असा प्रश्न रफ्तारला विचारण्यात आला. यावर, हा विषय माझ्यासाठी संपलाय. किमान मी तरी याचे उत्तर कधीही नाही, असेच देईल असे रफ्तार म्हणाला. मार्चमध्ये रफ्तार व हनीसिंहमधील संघर्षास सुरुवात झाली होती. हनी सिंहने ‘माफिया मुन्डीर’चा सदस्य रॅपर बादशहा याची टर उडवली होती. मग दोघांमध्येही जोरदार वाद झाला होता. रफ्तार लवकर ‘इन्स्टाग्राम लव’ हे सोलो साँग घेऊन येतोय.