सलमान खानसोबत साउथची ही अभिनेत्री दिसणार रोमांस करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 19:22 IST2021-01-25T19:22:21+5:302021-01-25T19:22:55+5:30
सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या आगामी 'अंतिम: द फायनल ट्रुथ' चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चर्चेत आहे.

सलमान खानसोबत साउथची ही अभिनेत्री दिसणार रोमांस करताना
बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि आयुष शर्मा यांच्या आगामी चित्रपट 'अंतिम : द फायनल ट्रुथ'ची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. तसेच चित्रपटाचा टीझरदेखील रिलीज करण्यात आला आहे आणि हा टीझर चाहत्यांना भावतो आहे. या चित्रपटात सलमान खान एका शीख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटासाठी सलमानसोबतच्या नायिकेची निवड करण्यात आली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रज्ञा जैसवाल.
'अंतिम : द फायनल ट्रुथ' चित्रपटात सलमान खानसोबत प्रज्ञा जैसवाल झळकणार आहे. प्रज्ञा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.मीडिया रिपोर्टनुसार, प्रज्ञा गेल्या काही दिवसांपासून अंतिमच्या संपूर्ण टीमसोबत गुपचूप शूटिंग करत होती.
ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने साउथमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. साउथमध्ये तिचा खूप मोठ फॅन फॉलोविंग आहे. प्रज्ञाने २०१४ मध्ये 'विराट्टू आई डेगा' चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट तेलुगू चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक कृष यांच्या 'कंचे' चित्रपटासाठी प्रज्ञा जैसवालला फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फीमेल डेब्यू- साउथचा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर प्रज्ञाने मागे वळून पाहिले नाही. ती आपल्या दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. सलमान खान आणि प्रज्ञा जैसवालचे चाहते त्या दोघांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
प्रज्ञा जैसवाल व्यतिरिक्त सलमान खानच्या या चित्रपटात टेलिव्हिजन अभिनेत्री महिमा मकवानादेखील दिसणार असल्याचे समजते आहे. ती आयुष शर्माच्या अपोझिट दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या जोरात सुरू आहे आणि फेब्रुवारीत संपण्याची शक्यता आहे. या सिनेमात निकितिन धीर आणि जीशु सेनगुप्तादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.