Kiccha Sudeep : किच्चा सुदीप पुन्हा बोलला,  साऊथ vs बॉलिवूड वादावर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 13:39 IST2022-07-19T13:37:12+5:302022-07-19T13:39:27+5:30

Kiccha Sudeep : हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं किच्चा सुदीप म्हणाला होता आणि त्याच्या या वक्तव्यामुळे अजय देवगण भडकला होता. आता पुन्हा एकदा किच्चा सुदीपने साऊथ vs बॉलिवूड या वादाला हवा देत, हिंदी चित्रपटांवर भाष्य केलं आहे.

south star kiccha sudeep weighs in south vs hindi films debate | Kiccha Sudeep : किच्चा सुदीप पुन्हा बोलला,  साऊथ vs बॉलिवूड वादावर म्हणाला...

Kiccha Sudeep : किच्चा सुदीप पुन्हा बोलला,  साऊथ vs बॉलिवूड वादावर म्हणाला...

बॉक्स ऑफिसवर साऊथ सिनेमांची चांगलीच चलती आहे.  पुष्पा, आरआरआर,  केजीएफ2 असे अनेक साऊथचे सिनेमे आलेत आणि या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमांनी बॉलिवूडच्या सिनेमांना अक्षरश: घाम फोडला. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड विरूद्ध साऊथ सिनेमे असा वाद रंगला आहे. तुम्हाला आठवत असेलच की, याच मुद्यावर साऊथ स्टार किच्चा सुदीप व अजय देवगण यांच्यात जुंपली होती. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं किच्चा सुदीप म्हणाला होता आणि त्याच्या या वक्तव्यामुळे अजय देवगण भडकला होता. आता पुन्हा एकदा किच्चा सुदीपने  या वादाला हवा देत,हिंदी चित्रपटांवर भाष्य केलं आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत किच्चा सुदीप हिंदी भाषिक राज्यांत साऊथ सिनेमांना मिळत असलेल्या यशावर बोलला.

काय म्हणाला किच्चा सुदीप
माझ्या मते, जेव्हा कंटेन्ट चांगला असतो तेव्हा त्याची ठिकठिकाणी चर्चा होतेय. हा काही जबरदस्तीचा मामला नाही. साऊथचे सिनेमे हिंदी बेल्टमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत आहेत आणि हे आपोआप घडत आहे. हा साऊथच्या उत्तम कथा, त्यांच्या आशय याचा विजय आहे. 
प्रेक्षक आजवर हम दिल दे चुके सनम, मैंने प्यार किया, शोले, हम साथ साथ है,  कभी खुशी कभी गम यासारखे चित्रपट आजवर पाहत आले आहेत. बंगळुरूच्या चित्रपटगृहांमध्येही गुजराती तसेच पंजाबी चित्रपट झळकताना आपण पाहतो. त्यामुळे चित्रपटांच्या बाबतीत सांस्कृतिक फरक आहे असा प्रश्नच निर्माण होत नाही. तुम्ही आजपर्यंत जे पाहिलेलं नाही ते जर मी तुम्हाला देत असेल तर तुम्हाला ते नक्कीच आवडणार. आता साऊथच्या सिनेमांना उत्तर भारतातील चित्रपटगृहांत रिलीज होण्याची संधी मिळत आहे. निर्बंध हटले आहेत. प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस संपते. यात बंधनांचा, निर्बंधांचाही समावेश आहे. आधी सुद्धा साऊथचे सिनेमे नॉर्थमध्ये रिलीज होत होते. पण फक्त सॅटेलाइट टीव्हीवर. आता साऊथचे सिनेमे थेट नॉर्थच्या चित्रपटगृहांत रिलीज होत आहेत, असं किच्चा सुदीप म्हणाला.

किच्चा सुदीपच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याच ‘विक्रांत रोना’ हा   चित्रपट 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  मूळ कन्नड भाषेतील हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शक अनुप भंडारी यांनी केलं आहे. या चित्रपटात किच्चा सुदीप व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस, निरूप भंडारी आणि नीता अशोक यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 28 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

Web Title: south star kiccha sudeep weighs in south vs hindi films debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.