कन्फर्म! 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनचा 'शक्तिमान' अवतार, रणवीरचा पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:18 IST2025-06-14T10:18:29+5:302025-06-14T10:18:46+5:30
रणवीर सिंहनंतर साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या नावाची सर्वत्र चर्चा होती. आता अखेर शक्तिमानसाठी अल्लू अर्जुनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कन्फर्म! 'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनचा 'शक्तिमान' अवतार, रणवीरचा पत्ता कट
९०च्या दशकातील इंडियन्सचा सुपरहिरो म्हणजे शक्तिमान. हा टीव्ही शो लागला की मुलं टीव्हीसमोरून हटायची नाहीत. मुकेश खन्नांनी साकारलेल्या शक्तिमानसमोर स्पायडरमॅन, बॅटमॅनही फिके पडतील इतकी तेव्हा त्याची क्रेझ होती. प्रचंड गाजलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या शक्तिमानवर सिनेमा बनवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचं नावही कन्फर्म झालं होतं. मात्र मुकेश खन्नांना रणवीर सिंह शक्तिमानच्या भूमिकेत रुचला नव्हता. त्यामुळे त्यांनी विरोध केला होता.
रणवीर सिंहनंतर साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या नावाची सर्वत्र चर्चा होती. आता अखेर शक्तिमानसाठी अल्लू अर्जुनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बॉलिवूड बललच्या रिपोर्टनुसार, "शक्तिमान अल्लू अर्जुनसोबत पुन्हा सुरू होत आहे. मल्याळम सुपरहिरो बेसिल जोसेफ हे सिनेमाचं दिग्दर्शन करतील. शक्तिमानच्या भूमिकेसाठी ते अल्लू अर्जुनसोबत चर्चा करत आहेत. सोनी पिक्चर्सचा हा प्रोजेक्ट आहे", असं जवळच्या सूत्रांनी सांगितल्याचं म्हटलं गेलं आहे.
'पुष्पा २'नंतर अल्लू अर्जुनचा भाव वाढला आहे. मुकेश खन्नांनीही 'पुष्पा २' पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनचं कौतुक करत त्याला शक्तिमानच्या रुपात बघण्याची इच्छा व्यक्ती केली होती. "मला वाटतं अल्लू अर्जुन आणखी बरेच चित्रपट पाहावे लागतील. शिवाय मला हे सुद्धा सांगावसं वाटतं की शक्तिमानची भूमिका तो उत्तरित्या निभावू शकतो. ते पात्र साकारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे", असं ते म्हणाले होते.