57 कोटींची मालकीण तरी 'या' अभिनेत्रीने पर्समध्ये जपून ठेवलेत शाहरुखने दिलेले 300 रु, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 17:15 IST2023-06-07T17:15:05+5:302023-06-07T17:15:47+5:30

अभिनेत्रीला किंग खानकडून 300 रुपये मिळाले होते आणि ती रक्कम आजही तिने तिच्या पर्समध्ये जपून ठेवली आहे.

south cinema why shah rukh khan gave priyamani rs 300 during chennai express song shoot | 57 कोटींची मालकीण तरी 'या' अभिनेत्रीने पर्समध्ये जपून ठेवलेत शाहरुखने दिलेले 300 रु, कारण...

57 कोटींची मालकीण तरी 'या' अभिनेत्रीने पर्समध्ये जपून ठेवलेत शाहरुखने दिलेले 300 रु, कारण...

प्रियामणी फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे जिने अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तमिळ, तेलुगू चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री हिंदी चित्रपटांचा देखील भाग आहे, त्यापैकी एक चित्रपट म्ह़णजे चेन्नई एक्स्प्रेस आहे. शाहरुख खान आणि दीपिका स्टारर चित्रपटाच्या '1234 गेट ऑन द डान्स फ्लोअर' या स्पेशल नंबरमध्ये प्रियामणी परफॉर्म करताना दिसली होती. तिने यामाध्यमातून बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली होती.

अभिनेत्रीला या शूटिंगदरम्यान किंग खानकडून 300 रुपये मिळाले होते आणि ती रक्कम आजही तिने तिच्या पर्समध्ये जपून ठेवली आहे.  एकदा मुलाखतीत तिने गाण्याच्या सेटवर शाहरुख खानने दिलेल्या 300 रुपयांबद्दल सांगितले होतं. तिने शाहरुखसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. अभिनेत्री म्हणाली की, तो आपल्या देशातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे जो कधीही यश आपल्या डोक्यात जाऊ देत नाही. त्यामुळेच लोक त्याच्यावर जास्त प्रेम करतात. 

प्रियामणी म्हणाली, 'आम्ही चेन्नई एक्स्प्रेसच्या गाण्यासाठी पाच रात्रींहून अधिक काळ शूटिंग केलं आणि हा एक चांगला अनुभव होता.' अभिनेत्रीने कबूल केलं की शाहरुखने तिला पहिल्या दिवसापासून खूप कम्फर्टेबल केलं आहे. ती म्हणते, 'मी त्याला भेटल्यापासून शूटिंग सुरू करण्याच्या एक दिवस आधीच पोहोचली. तेव्हापासून शूटिंग संपेपर्यंत तो एक चांगला मित्र झाला. ज्याने आम्हा सर्वांची खूप चांगली काळजी घेतली."

अभिनेत्रीने खुलासा केला की, गाण्याच्या शूटिंगदरम्यान आम्ही त्याच्या आयपॅडवर कौन बनेगा करोडपती देखील खेळलो होतो. त्यानंतर त्याने मला 300 रुपये दिले जे माझ्या पर्समध्ये अजूनही आहेत. प्रियामणी पुन्हा 'द फॅमिली मॅन 3' मध्ये दिसणार आहे. 38 वर्षीय अभिनेत्री 57 कोटींची मालकीण आहे, परंतु तरीही तिने किंग खानने दिलेले 300 रुपये जपून ठेवले आणि कधीही ते खर्च करत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: south cinema why shah rukh khan gave priyamani rs 300 during chennai express song shoot