डोनाशी पळून केलं लग्न, तरीही 'या' अभिनेत्रीवर जडला होता सौरव गांगुलीचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:29 IST2025-07-08T14:29:07+5:302025-07-08T14:29:38+5:30

सौरव त्यावेळी विवाहित होता आणि अफेअरची अफवा पत्नी डोना यांना समजली होती.

Sourav Ganguly Affair With Nagma Cricketer Want To Divorce Wife For Actress | डोनाशी पळून केलं लग्न, तरीही 'या' अभिनेत्रीवर जडला होता सौरव गांगुलीचा जीव!

डोनाशी पळून केलं लग्न, तरीही 'या' अभिनेत्रीवर जडला होता सौरव गांगुलीचा जीव!

Sourav Ganguly Affair With Actress: भारतीय क्रिकेटचा 'दादा' म्हणून सौरव गांगुली ओळखला जातो.  सौरव गांगुलीला 'दादा' हे टोपणनाव त्याच्या चाहत्यांनी आणि क्रिकेट जगतातील लोकांनी दिले आहे. 'दादा' या बंगाली शब्दाचा अर्थ 'मोठा भाऊ' असा होतो. सौरव गांगुली हा केवळ त्याच्या मैदानावरील खेळीमुळेच नव्हे, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत राहिला आहे. एका काळी गांगुलीचं नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. विशेष म्हणजे, त्यावेळी सौरव विवाहित होता.

सौरव गांगुलीनं १२ ऑगस्ट १९९६ रोजी बालपणीच्या मैत्रिणीसोबत कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. लग्नाबद्दल घरच्यांना काहीही न सांगताच सौरव थेट श्रीलंका टूरवर गेला होता. काही दिवसानंतर लग्नाची बातमी समोर आली. यानंतर विरोध असतानाही दोघांच्या घरच्यांना नमते घ्यावं लागलं होतं. त्यानंतर पुन्हा २१ फेब्रुवारी १९९७ ला सौरव आणि डोना यांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केलं होतं. डोनावर प्रचंड प्रेम असतानाही सौरव हा बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता.  गांगुली आणि त्या अभिनेत्रीमधील जवळीक एवढी वाढली होती की, तो तिच्यासाठी लग्न मोडण्यासही तयार होता. 

ती अभिनेत्री होती नगमा. सौरव गांगुली आणि नगमा यांच्या अफेअरची बॉलिवूड आणि क्रिकेट वर्तुळातही मोठी चर्चा होती. मुबंईत एका कॉन्फ्रेन्समध्ये दोघांची भेट झाल्याचं बोललं जातं. त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं आणि जवळपास २ वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं. दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण, डोना हिनं सौरव गांगुलीला घटस्फोट देण्यास नकार दिला. या अफेअरच्या चर्चांचा परिणाम त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर  होऊ लागला आणि वाद वाढत गेल्याने सौरव आणि नगमा एकमेंकापासून दूर राहू लागले.  पुढे २००१ मध्ये सौरव गांगुली आणि नगमा यांचं ब्रेकअप झालं.  त्यानंतर सौरव आपल्या वैवाहिक आयुष्यात परतला. आज सौरव आणि डोना यांना एका मुलगी आहे. तिचं नाव सना असं आहे. दरम्यान,  नगमा हिने साऊथ, बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलं आहे. आज नगमा अभिनयापासून दूर सामाजिक कार्यात सक्रिय आहे. 

Web Title: Sourav Ganguly Affair With Nagma Cricketer Want To Divorce Wife For Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.