सोफिया हयात पुन्हा वादात; तळव्यांवर गोंदवला स्वस्तिकचा टॅटू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 11:34 IST2017-02-20T06:04:40+5:302017-02-20T11:34:40+5:30
अभिनेत्रीची नन बनलेली सोफिया हयात पुन्हा वादात सापडली आहे. सोफियाने तिच्या तळव्यांवर गोंदवलेल्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ...

सोफिया हयात पुन्हा वादात; तळव्यांवर गोंदवला स्वस्तिकचा टॅटू!
अ िनेत्रीची नन बनलेली सोफिया हयात पुन्हा वादात सापडली आहे. सोफियाने तिच्या तळव्यांवर गोंदवलेल्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या फोटोवर लोकांनी चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. सोफियाने तिच्या दोन्ही तळव्यांवर स्वस्तिकचा टॅटू गोंदवला आहे. स्वस्तिक या चिन्हाचे हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सोफियाच्या या टॅटूचा लोकांनी तीव्र विरोध केला. तिने शेअर केलेल्या या टॅटूच्या फोटोवर सुमारे दोनशेवर लोकांनी कमेंट दिल्यात. सगळ्यांनीच तिच्या या कृत्याची निंदा केली. काही लोकांनी सोफियाला देशाबाहेर हाकलून देण्याची मागणी केली. काहींनी तिला कायदेशीर नोटीस पाठविण्याची धमकी दिली. केवळ स्वस्तिकच नाही तर सोफियाने गुडघ्याच्या खाली मुस्लिम धर्माचे प्रतिक असलेला एक टॅटूही गोंदवला आहे.
![]()
![]()
![]()
गतवर्षी मे महिन्यात सोफियाने ती नन बनली असल्याचे जाहिर केले होते. तिने तिचे सिलिकॉन ब्रेस्टही रिमुव्ह केले होते. नन बनल्यानंतर सोफिया काही दिवस सोज्वळ लूक मध्ये दिसली. पण त्यानंतर काहीच दिवसांत बोल्ड फोटोशूट करून ती चर्चेत आली होती. ब्रिटेनची रहिवासी असलेल्या सोफियाला जुलै 2012मध्ये व्होग इटालियाने कर्वी आयकॉनचे टायटल देण्यात आले होते. सप्टेंबर 2013मध्ये ऋऌट मासिकाने तिला जगातील 81वी मोस्ट सेक्सिएस्ट वुमनचा करार दिला होता. बॉलिवूड पार्टी आणि रेड कार्पेट इव्हेंट्समध्ये सोफिया बोल्ड लूकसाठी ओळखली जात होती. सोशल मीडियावरसुध्दा तिने अनेक टॉपलेस आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमध्ये ती सहभागी झाली होती. अर्थातच ‘बिग बॉस’च्या घरातील तिचा वावरही वादग्रस्तच ठरला होता. याठिकाणी तिने तिचा प्रतिस्पर्धक अरमान कोहली याच्यावर छेडछाडीचा आरोप लावला होता.
ALSO READ : म्हणून नन बनली सोफिया!!
मदर सोफियाचा युटर्न !