चिमुरड्यानेच केली होती जादू ! 21 वर्षानंतर असा दिसतो ‘हिरा ठाकूर’चा मुलगा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 11:19 IST2020-07-27T08:00:00+5:302020-07-27T11:19:38+5:30

‘सूर्यवंशम’मधील बालकलाकार झाला मोठा 

sooryavansham child actor anand vardhan then and now | चिमुरड्यानेच केली होती जादू ! 21 वर्षानंतर असा दिसतो ‘हिरा ठाकूर’चा मुलगा!!

चिमुरड्यानेच केली होती जादू ! 21 वर्षानंतर असा दिसतो ‘हिरा ठाकूर’चा मुलगा!!

ठळक मुद्दे ‘सूर्यवंशम’नंतर आनंद फिल्मी दुनियेपासून दुरावला. अर्थात तोपर्यंत त्याने अनेक दिग्गजांसोबत काम केले होते.

1998 साली प्रदर्शित झालेला  ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप झाला. मात्र आजही या सिनेमाचे नाव लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. याला कारण म्हणजे, सेटमॅक्स या चॅनेलवर दोन-तीन दिवसाआड हा सिनेमा दाखवला जातो म्हणजे जातोच. 
सेट मॅक्सने या सिनेमाचे 100 वर्षांपर्यंतचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे चॅनलवर हा सिनेमा वारंवार दाखवला जातो. कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भर देणारा, विविध भावभावनांची सरमिसळ असलेला हा सिनेमा तेलुगु दिग्दर्शक ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा सिनेमा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला आणि एकमेव हिंदी सिनेमा आहे. या चित्रपटातील दोन्ही नायिका या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. यातील अमिताभ बच्चन यांच्या दुहेरी भूमिकेने समीक्षकांची वाहवा मिळवली आणि आजही त्यांची ही दुहेरी भूमिका लोकांच्या लक्षात आहे.

‘सूर्यवंशम’ या चित्रपटातील पात्र, कथा आणि संवाद आता प्रेक्षकांना तोंडपाठ झालेले आहेत. हिरा ठाकूर, गौरी, मेजर रंजित हे पात्र तर प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. तसेच या चित्रपटातील कादर खान आणि अनुपम खेर यांची कॉमेडी देखील प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. या सिनेमातील आणखी एक चेहरा तुम्हाला आठवत असेल, तो म्हणजे    भानुप्रतापच्या नातवाची भूमिका साकारणारा बाल कलाकार. होय, ठाकूर भानुप्रताप यांना खीर देणारा   हा बालकलाकार आता मोठा झाला आहे. त्याचे नाव आनंद वर्धन.

  आनंद हा तेलगू अभिनेता आहे आणि त्याने 20 हून अधिक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. आनंद प्रख्यात गायक बीपी श्रीनिवास यांचा नातू आहे. आपला नातू अभिनेता व्हावा, अशी बीपींची इच्छा होती. त्यामुळे ते नेहमी फिल्ममेकर्सकडे त्याला घेऊन जात. एकदा दिग्दर्शक गुणशंकर यांनी आनंदला पाहिले आणि ‘रामायणम’ या सिनेमासाठी कासट केले. या सिनेमात आनंद वाल्मिकी आणि हनुमानाच्या भूमिकेत दिला. यानंतर आनंदने तेलगू व तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशम’मध्ये काम केले.

हाच सिनेमा पुढे हिंदी बनवण्यात आला. यावेळी आनंद 13 वर्षांचा होता. अर्थात ‘सूर्यवंशम’नंतर आनंद फिल्मी दुनियेपासून दुरावला. अर्थात तोपर्यंत त्याने अनेक दिग्गजांसोबत काम केले होते.

Web Title: sooryavansham child actor anand vardhan then and now