'हम साथ साथ है' मध्ये 'या' भूमिकेसाठी शाहरुखला दिलेली ऑफर, सूरज बडजात्यांचा खुलासा
By ऋचा वझे | Updated: February 19, 2025 17:03 IST2025-02-19T17:01:36+5:302025-02-19T17:03:10+5:30
'हम साथ साथ है' मध्ये या भूमिकेत दिसला असता शाहरुख खान

'हम साथ साथ है' मध्ये 'या' भूमिकेसाठी शाहरुखला दिलेली ऑफर, सूरज बडजात्यांचा खुलासा
९० च्या दशकात राजश्री प्रोडक्शन्सच्या सिनेमांची खूप चर्चा असायची. कौटुंबिक विषय, हलकी फुलकी प्रेमकहाणी यावरच त्यांचे सिनेमे असायचे. दबंग अभिनेता सलमान खानला (Salman Khan) तर राजश्रीमुळेच 'प्रेम' ही ओळख मिळाली. 'हम आपके है कौनट,' मैने प्यार किया','हम साथ साथ है' सारख्या सिनेमांमध्ये तो प्रेम या भूमिकेत दिसला. पण तुम्हाला माहितीये का हम साथ साथ है सिनेमातील एका भूमिकेसाठी शाहरुख खानलाही (Shahrukh Khan) ऑफर होती.
दिग्दर्शक, निर्माते सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांनी नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना शाहरुख खानबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "ही खूपच जुनी गोष्ट आहे. हम साथ साथ है सिनेमात सैफ अली खानच्या आधी आम्ही शाहरुखचा विचार केला होता. बसून चर्चाही झाली होती. पण ही खूपच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. काही गोष्टी जमल्या नाहीत आणि नंतर सैफची निवड झाली."
सलमानसोबत पुन्हा कधी काम करणार? यावर ते म्हणाले, "सलमानसोबत सिनेमा करण्यासाठी आता मला जरा वेळ लागेल. ही मोठी जबाबदारी आहे कारण आता मला त्याच्या वयानुसार गोष्ट लिहावी लागेल. त्याच्यासाठी अॅक्शन करणं सोपं आहे पण पुन्हा एखादा कौटुंबिक विषयावरचा सिनेमा परत करणं यासाठी आता जरा मॅच्युरिटी लागेल. त्यामुळे त्यासाठी जरा वेळ लागेल. म्हणून मी दुसऱ्या सिनेमावर काम करत आहे."